२२ नोव्हेंबर २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली सस्पेन्स थ्रिलर वेब सीरिज ‘ये काली काली आंखें’चा सीझन २ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ताहिर राज भसीन, श्वेता त्रिपाठी, आंचल सिंह आणि सौरभ यांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा सीजन सस्पेन्स, थ्रिलर, रोमान्स आणि ॲक्शन यांचा संगम आहे. पहिल्या सीझनप्रमाणेच दुसऱ्या सीझनलाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

जर तुम्हाला ‘ये काली काली आंखें’ च्या दोन्ही सीझनप्रमाणेच तुम्हाला आणखी दमदार सस्पेन्स आणि थ्रिलर सीरिज बघायची आवड असेल, तर नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेल्या काही खास वेब सीरिज तुम्हाला नक्कीच आवडतील. या यादीतील मालिका पाहायला सुरुवात केल्यानंतर यातील जबरदस्त ट्विस्ट आणि थरारक दृश्यांमुळे ही सीरिज बिंज वॉच करण्याची इच्छा होईल.

Assembly election 2024 BJP Congress contest in five constituencies out of six in Chandrapur district
चंद्रपूर जिल्ह्यात तुल्यबळ लढती, राजुऱ्यात शेतकरी संघटनेमुळे चुरस
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Mangal vakri 2024 Mangal in kark rashi astrology
Mangal Vakri 2024 : डिसेंबर महिन्यात ‘या’ तीन राशींना लागणार बंपर लॉटरी! मंगळ वक्रीमुळे संपत्तीत होईल प्रचंड वाढ अन् करियरमध्ये प्रगती
Eligibility criteria for admission to AYUSH courses is little less
आयुष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे पात्रता निकष शिथील
Uddhav Thackeray Launch Vachanan Nama
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा वचननामा जाहीर, छत्रपती शिवरायांचं मंदिर, मोफत शिक्षण आणि काय काय वचनं?
karjat khalapur assembly constituency
लक्षवेधी लढत: शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी वादाचा दुसरा अंक
Horoscope 2025 Malavya rajyog in meen shukra gochar
Malavya Rajyog 2025 : नवीन वर्षात ‘या’ राशींची होणार आर्थिक भरभराट! मालव्य राजयोगामुळे बनाल अमाप संपत्तीचे मालक अन् घराचे स्वप्न होईल पूर्ण

हेही वाचा…‘मिर्झापूर’पेक्षाही दमदार ‘या’ सीरिज प्राइम व्हिडीओवर आहेत उपलब्ध, तुम्ही पाहिल्यात का?

जामतारा

Jamtara On Netflix : सत्य घटनांवर आधारित ही सीरिज २०२० साली प्रदर्शित झाली होती. आतापर्यंत या सीरिजचे दोन सीझन आले असून, प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी राज्य केले आहे. सीमा पाहवा, दिब्येंदु भट्टाचार्य, अमित सियाल, स्पर्श श्रीवास्तव आणि मोनिका पानवर यांसारख्या कलाकारांनी यात प्रमुख भूमिका केल्या असून ही सीरिज सौमेंद्र पाधी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झाली आहे. सायबर क्राइम, धक्कादायक आणि थरारक कथेसाठी तुम्ही ही मालिका नक्कीच पाहू शकता.

सेक्रेड गेम्स

Sacred Games On Netflix : नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सेक्रेड गेम्स’चे दोन सीझन प्रदर्शित झाले आहेत. ही सीरिज मुंबईतील डॉन गणेश गायतोंडे आणि पोलिस निरीक्षक सरताज सिंह या दोन पात्रांभोवती फिरते. गायतोंडेची गुन्हेगारी आणि त्यानंतर घडणाऱ्या धक्कादायक घटना पाहण्यासाठी ही मालिका नेटफ्लिक्सवर नक्की पाहता येईल.

हेही वाचा…८ वर्षांचं भांडण मिटलं! अखेर गोविंदा व भाचा कृष्णा अभिषेक दिसणार एकत्र; कॉमेडियन म्हणाला, “आता मी तुम्हाला…”

किलर सूप

Killer Soup On Netflix : २०२४ मध्ये प्रदर्शित झालेली ‘किलर सूप’ ही एक इंटरेस्टिंग थ्रिलर मालिका आहे. कोंकणा सेन शर्मा आणि मनोज बाजपेयी यांच्या अप्रतिम अभिनयाने सजलेली ही मालिका स्वाती आणि प्रभाकर शेट्टी यांच्या आयुष्याभोवती फिरते. पतीची हत्या करण्याच्या स्वातीच्या प्लॅननंतर घडणाऱ्या घटनांनी ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

बार्ड ऑफ ब्लड

Bard Of Blood On Netflix : रिभु दासगुप्ता दिग्दर्शित ही थ्रिलर मालिका २०१९ साली प्रदर्शित झाली होती. इमरान हाश्मी, सोभिता धुलिपाला, विनीत कुमार सिंह आणि जयदीप अहलावत यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजमध्ये सिक्रेट एजंट्सच्या मिशनची कहाणी आहे. बलुचिस्तानमध्ये अडकलेल्या एजंट्सना वाचवण्यासाठी सुरू असलेली धावपळ, त्यातील अडचणी आणि थरार प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

हेही वाचा…गूढ कथा अन् खिळवून ठेवणारे थरारक सीन्स; OTT वरील ‘हे’ सिनेमे पाहिलेत का? यातील एक चित्रपट आहे सत्य घटनेवर आधारित

शी

She On Netflix : आदिती पोहनकर आणि विजय वर्मा यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘शी’ या मालिकेचे दोन सीझन प्रदर्शित झाले आहेत. एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने अंडरवर्ल्डचा पर्दाफाश करण्यासाठी घेतलेल्या धोकादायक गुप्त मोहिमेवर आधारित ही मालिका आहे. तिच्यावर आलेल्या अनेक संकटांवर मात करताना तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी ही मालिका बघता येईल.