Bigg Boss OTT Season 3 : 'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. यंदा अरमान मलिक व त्याच्या दोन पत्नी या शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. यानंतर पुढे थोड्याच दिवसांत अरमानची पहिली पत्नी पायल मलिक घराच्या बाहेर पडली. सध्या अरमान व कृतिका या 'बिग बॉस ओटीटी'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी आहेत. या दोघांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून हा शो वादात सापडला आहे. 'बिग बॉस ओटीटी'वर सर्व स्तरांतून टीका करण्यात येत आहे. आमदार मनीषा कायंदे यांनी देखील या कार्यक्रमाच्या विरोधात तक्रार करत शो बंद करण्याची मागणी केली आहे. सर्वत्र झालेल्या टीकेनंतर आता यावर जिओ सिनेमाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. Bigg Boss OTT मधील हा व्हिडीओ छेडछाड करून व्हायरल करण्यात आल्याचं जिओ सिनेमाकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात 'बिग बॉस ओटीटी'च्या निर्मात्यांनी बुधवारी ( २४ जुलै ) मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम विभागात तक्रार दाखल केली आहे. हेही वाचा : Video : ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्याने घेतलं नवीन घर! हटके नेमप्लेटने वेधलं लक्ष, व्हिडीओत दाखवली संपूर्ण झलक "जिओ सिनेमा अॅपवर प्रसारित केल्या जाणाऱ्या सगळ्या कंटेटवर कंपनीचे लक्ष असते. यासाठी आमच्याकडे अत्यंत कठोर नियम व मार्गदर्शक तत्त्वे आहेत. 'बिग बॉस ओटीटी'मधून अशाप्रकारचा कोणताही चुकीचा कंटेट प्रसारित झालेला नाही. जो अश्लील व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे त्याच्या मूळ व्हिडीओमध्ये छेडछाड करून तो व्हायरल करण्यात आला आहे. व्हायरल होणारा अश्लील व्हिडीओ हा खोटा व बनावट आहे. अशाप्रकारे बनावट व्हिडीओ व्हायरल होणं हा चिंतेचा विषय आहे. कृपया यामागच्या खऱ्या आरोपीचा शोध घ्यावा." असं निवेदन जारी करत जिओ सिनेमाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. Shiv Sena Legislator Manisha Kayande said that the episode showed a contestant Armaan Malik in an intimate moment with Kritika Malik under the covers in the bedroom. She demanded a ban on the show.That viral scene part were edited from the international show, Big Brother. ?♂️ https://t.co/UOcA537K0u— #BiggBoss_Tak? (@BiggBoss_Tak) July 22, 2024 हेही वाचा : “निर्मात्यांनी इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान सेटवर…”, ‘लस्ट स्टोरीज २’ फेम अभिनेत्रीने सांगितला ‘या’ सीरिजचा अनुभव Bigg Boss OTT 3 : अरमान व कृतिका Bigg Boss OTT मधील हे नेमकं प्रकरण काय ? अरमान मलिक व त्याची दुसरी पत्नी कृतिका यांच्यातील कथित आक्षेपार्ह कृतीचा व्हिडीओ काही दिवसांआधी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण येऊन Bigg Boss OTT हा कौटुंबिक शो असल्याने यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली जाऊ लागली. नेटकऱ्यांनी या कृत्याबद्दल नाराजी देखील व्यक्त केली होती. यानंतर निर्मात्यांनी स्पष्टीकरण देत हा व्हिडीओ बनावट असल्याचं सांगत आता सायबर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.