Bigg Boss OTT Season 3 Grand Finale Updates: शुक्रवारी (२ ऑगस्ट) 'बिग बॉस OTT 3' चा ग्रँड फिनाले पार पडला. दीड महिने चाललेल्या या शोला विजेता मिळाला आहे. अभिनेत्री सना मकबूल बिग बॉस ओटीटी ३ ची (Sana Makbul won Bigg Boss OTT 3) विजेती ठरली. या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये 'स्त्री २' चे मुख्य कलाकार श्रद्धा कपूर व राजकुमार राव यांनी हजेरी लावली होती. ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात सना मकबूल, पौलोमी दास, विशाल पांडे, सना सुलतान, चंद्रिका दीक्षित, दीपक चौरसिया, साई केतक राव, नीरज गोयत, शिवानी कुमारी, लव कटारिया, नेझी, मुनिषा खटवानी, अरमान मलिक, पायल मलिक, कृतिका मलिक आणि रणवीर शौरी हे स्पर्धक सहभागी झाले होते. यापैकी रणवीर शौरी, नेझी, सना मकबूल, साई केतन आणि कृतिका मलिक हे टॉप पाच स्पर्धक होते. या सर्वांना मागे टाकत सना मकबूलने बिग बॉस ओटीटी ३ चे विजेतेपद पटकावले.