Bigg Boss OTT Season 3: अखेर ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व सुरू झालं आहे. अनिल कपूर यांच्या दमदार आवाजात यंदाच्या पर्वाची सुरुवात झाली असून नवं आणि काहीतरी हटके पाहायला मिळत आहे. पत्रकार, मॉडेल, अभिनेत्री, युट्यूबर, रॅपर, कुस्तीपटू अशा सगळ्या क्षेत्रातील स्पर्धकांची ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात एन्ट्री झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे १७ वर्षांचा जुना नियम यंदाच्या पर्वाने तोडला आहे. ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातील स्पर्धकांना पर्सनल फोन वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.

‘बिग बॉस’चे आतापर्यंत १७ पर्व झाले. तसेच ओटीटीचे दोन पर्व झाले. शिवाय इतर भाषांमध्येही बिग बॉस होतं असतं. पण आतापर्यंतच्या कुठल्याही ‘बिग बॉस’च्या कार्यक्रमात फोन वापरण्याची परवानगी दिली गेली नव्हती. तसंच बाहेरील माहिती स्पर्धकांना देण्याचीही परवानगी नव्हती. पण आता ‘बिग बॉस’च्या इतिहासात पहिल्यादांचा स्पर्धकांना फोन वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा – Video: ‘पुष्पा २’मधील ‘सूसेकी’ गाण्यावर पुन्हा एकदा थिरकली सोनाली कुलकर्णी, साथ दिली तीन सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शकांनी

‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाच्या प्रीमियरनंतर लाइव्हमध्ये दाखवण्यात आलं की, ‘बिग बॉस’ने प्रत्येक स्पर्धकांना कन्फेशन रुममध्ये बोलवून त्यांना पर्सनल फोन दिला. पण आता त्या फोनचा वापर स्पर्धक कशाप्रकारे करणार आहेत, हे येत्या काळातच समजेल. पण याशिवाय ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात आणखी एक मोठा ट्विस्ट आहे. यंदाच्या पर्वात एकूण १६ स्पर्धक आहेत; ज्यामधील १५ जणांना ‘बिग बॉस’ने घरातले आणि एकाला बाहेरचा म्हणून घोषित केलं आहे. म्हणजे हा एक सदस्य बाहेरील गोष्टी घरातल्या सदस्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. ‘बिग बॉस’ने सना सुलतानला ही संधी दिली आहे.

हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील स्वाती व इंद्राही जबरदस्त थिरकल्या ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘सूसेकी’ गाण्यावर, पाहा व्हिडीओ

‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात कोण-कोण स्पर्धक आहेत?

‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात सना मकबूल, पौलोमी दास, विशाल पांडे, सना सुलतान, चंद्रिका दीक्षित, दीपक चौरसिया, साई केतक राव, नीरज गोयत, शिवानी कुमारी, लव कटारिया, नेझी, मुनिषा खटवानी, अरमान मलिक, पायल मलिक, कृतिका मलिक आणि रणवीर शौरी हे स्पर्धक आहेत.