बोल्ड कंटेंट, अपशब्द यामुळे थिएटरमध्ये रिलीज न होऊ शकलेले बरेच चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केले जातात. असाच एक चित्रपट प्रचंड चर्चेत राहिला होता. या चित्रपटात एका मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. एका मुलीचे एकाच वेळी दोन मित्रांबरोबर अफेअर असते. या चित्रपटात बोल्ड दृश्यांचा भडीमार आहे. थिएटर्समध्ये बंदी घालण्यात आलेल्या या चित्रपटाने ओटीटीवर धुमाकूळ घातला होता.

EVOL (एवोल) असं या चित्रपटाचं नाव आहे. हा एक तेलुगू रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन व निर्मिती राम योगी वेलागापुडी यांनी केली आहे. शिवकुमार रामचंद्रवरपु, सूर्या श्रीनिवास, जेनिफर इमॅन्युएल आणि दिव्या शर्मा हे कलाकार आहेत.

चित्रपटाची कथा

हा चित्रपट दोन विवाहित जोडप्यांच्या आयुष्यावर आधारित आहे. कथेची सुरुवात ‘प्रभू’ या पात्राने आपली पत्नी निधी हिला त्याच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल सांगितलेल्या सत्यापासून होते. त्याचं जिच्याबरोबर अफेअर असतं, तिचं दुसऱ्याही एका तरुणाबरोबर अफेअर असतं. या एका खुलाशामुळे त्यांच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होते. त्यानंतर विश्वासघात, सूड आणि गुंतागुंतीच्या नात्यांचा एक थरार सुरू होतो. ‘EVOL’ हे नाव ‘LOVE’ या शब्दाचे उलट रूप आहे. ही एक उलट क्रमाने चालणारी प्रेमकथा आहे, असं दिग्दर्शकाने म्हटलंय.

‘एवोल’ चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये असा जबरदस्त खुलासा होतो, ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. चित्रपटाचा कंटेंट खूपच बोल्ड आहे, त्यामुळे हा चित्रपट तुम्हाला कुटुंबाबरोबर अजिबात पाहता येणार नाही. या चित्रपटाची निर्मिती नक्षत्र फिल्म्स लॅब्सने केली आहे.

‘EVOL’ हा चित्रपट त्याच्या बोल्ड आणि बोल्ड दृश्यांमुळे खूप चर्चेत राहिला होता. सेन्सॉर बोर्डाने यातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला होता, त्यामुळे चित्रपटाला ‘A’ म्हणजेच फक्त प्रौढांसाठी हे प्रमाणपत्र दिले. काही अहवालांनुसार, बोल्ड कंटेंटमुळे याला थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यास अडचणी आल्या होत्या. शेवटी थिएटरमध्ये प्रदर्शित न करता निर्मात्यांनी हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. हा चित्रपट Aha (आहा) आणि Airtel Xstream वर उपलब्ध आहे. हा चित्रपट त्याच्या युरोपियन सिनेमॅटिक स्टाईल आणि वेगळ्या प्रकारच्या पटकथेसाठी ओळखला जातो.