तापसी पन्नूची नवी इनिंग, अभिनेत्री दिसणार नव्या भूमिकेत; आगामी थरारपट ओटीटीवर | bollywood actress taapsee pannu debuet film as producer is set to release on ott platform | Loksatta

तापसी पन्नूची नवी इनिंग, अभिनेत्री दिसणार नव्या भूमिकेत; आगामी थरारपट ओटीटीवर

तापसीच्या या आगामी चित्रपटासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत

तापसी पन्नूची नवी इनिंग, अभिनेत्री दिसणार नव्या भूमिकेत; आगामी थरारपट ओटीटीवर

अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. तिच्या अभिनयाची लोक प्रशंसा करतात, पण तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिला बरंच ट्रोलही केलं जातं. तापसीचा आगामी चित्रपट आता थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची बातमी समोर आली आहे. सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून तापसीने ही गोष्ट शेअर केली आहे.

तापसीचा आगामी चित्रपट ‘ब्लर’ हा चित्रपटगृहाऐवजी थेट ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचं तापसीने स्पष्ट केलं आहे. चित्रपटाचं एक पोस्टर शेअर करत तिने ही बातमी दिली आहे. तापसीचा हा चित्रपटही एक सस्पेन्स थ्रिलर असणार आहे हे पोस्टरवर स्पष्ट होत आहे. तापसीने शेअर केलेलं पोस्टर पाहून तिचे चाहते चांगलेच उत्सुक झाले आहेत.

आणखी वाचा : बॉक्स ऑफिसवर सुपरहीट ठरलेला ‘कांतारा’ आता ओटीटीवर; वाचा कुठे आणि कधी पाहता येणार चित्रपट?

तापसीच्या या चित्रपटाला सोशल मीडियावर लोकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय या चित्रपटातून तापसी प्रथमच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. तापसी पन्नू मध्यंतरी ‘दोबारा’ या चित्रपटात झळकली. याचं दिग्दर्शन अनुराग कश्यपने केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता. या चित्रपटादरम्यान अनुराग आणि तापसीच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हा चित्रपट फ्लॉप ठरला होता.

तापसीच्या या आगामी चित्रपटासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत. हा चित्रपट ९ डिसेंबर २०२२ रोजी ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच तापसी ही राजकुमार हिरानी आणि शाहरुख खानच्या ‘डंकी’ या चित्रपटात झळकणार आहे, शिवाय प्रतीक गांधीबरोबरच ‘वो लडकी है कहा’ या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-11-2022 at 10:30 IST
Next Story
बॉक्स ऑफिसवर सुपरहीट ठरलेला ‘कांतारा’ आता ओटीटीवर; वाचा कुठे आणि कधी पाहता येणार चित्रपट?