Crime Thriller Movie: ओटीटी असे माध्यम आहे की ज्यावर विविध भाषा, विविध जॉनरमधील कंटेंट पाहायला मिळतात. ओटीटीमुळे वेब सीरिजसारखी संकल्पना पुढे आली. त्यामुळे घरबसल्या किंवा जगात कुठेही असाल तरीही वेब सीरिज, आवडते चित्रपट तसेच डॉक्युमेंटरी, क्रिकेट सामने, ॲनिमेटेड चित्रपट पाहता येतात.

अनेकदा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न होता ओटीटी प्लॅटफॉर्मवर होतात. नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, झी ५, एम एक्स प्लेअर असे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत.

आज आपण अशा एका क्राइम थ्रिलर चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत, जो ओटीटीवर सध्या उपलब्ध आहे. तुम्हाला जर क्राइम, थ्रिलर, सस्पेन्स असणारे चित्रपट आवडत असतील तर तुम्ही हा चित्रपट नक्की पाहिला पाहिजे.

७ फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला चित्रपट

भावना, क्राइम, सस्पेन्स यांचे योग्य मिश्रण असलेल्या चित्रपटाला ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. ‘चिथा’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाची गोष्ट पाच-सहा वर्षांच्या मुलीच्या भोवती फिरते. या मुलीचे नाव सुंदरी असे आहे. ती तिच्या काकांबरोबर साधे जीवन जगत असते. काकाची भूमिका अभिनेता सिद्धार्थने साकारली आहे.

सुंदरीच्या एका मैत्रिणीबरोबर एक वाईट घटना घडते आणि त्यानंतर गोष्टीत ट्विस्ट येतो. हे सगळे सुंदरीच्या काकाने केले आहे असे म्हटले जाते. या सगळ्यात सुंदरी किडनॅप होते. गुन्हेगार दुसराच कोणीतरी आहे हे हळूहळू समोर येते, त्यानंतर सिद्धार्थ आणि पोलिस मिळून गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. २ तास १९ मिनिटांच्या या चित्रपटात अनेक नवीन वळणं येताना दिसतात.

हा चित्रपट सुरुवातीला तमिळ भाषेत बनवला गेला होता. आता हा चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. २०२३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस यू अरुण कुमार यांनी केले आहे, तर निर्मिती सिद्धार्थने केली आहे.

‘चिथा’ चित्रपटाचे बजेट फक्त ५ कोटी इतके होते. मात्र, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १२.३६ कोटींची कमाई केली. ६९ व्या साऊथ फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये चित्रपटाला ७ पुरस्कार मिळाले. उत्तम थ्रिलर चित्रपटांपैकी एक म्हणून ‘चिथा’ सिनेमाचे नाव घेतले जात आहे.

IMDb ने चित्रपटाला ८.२ रेटिंग दिले आहे. हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर पाहता येईल.