ओटीटीवर कंटेंटची कमी नाही, पण उपलब्ध असलेल्या असंख्य पर्यायांपैकी मोजक्या आणि उत्कृष्ट सीरिज किंवा चित्रपट शोधणं थोडं कठीण काम आहे. मात्र, तुम्ही काळजी करू नका. कारण आम्ही या आठवड्यातील एका उत्तम हिंदी सीरिजबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. ही दमदार ७ भागांची सस्पेन्स सीरिज पाहताना तुमची नजर स्क्रीनवरून हटणार नाही.

मोठ्या पडद्यापासून डिजिटल प्लॅटफॉर्मपर्यंत सध्या क्राइम थ्रिलर विषयाची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. ओटीटीबद्दल बोलायचं झाल्यास अमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि नेटफ्लिक्सवर या जॉनरमधील अनेक सीरिज एकापाठोपाठ एक प्रदर्शित होत आहेत. आम्ही ज्या सीरिजबद्दल सांगतोय, त्यात एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या सीरिजचं नाव आहे ‘दलदल’.

ओटीटी प्रेमींसाठी शुक्रवारचा दिवस खूप खास मानला जातो, कारण याच दिवशी लोक शनिवार-रविवारी काय पाहायचे, याचा विचार करत असतात. तुम्हीही कन्फ्यूज असाल की या आठवड्यात काय पाहावं? तर तुम्ही भूमी पेडणेकरची ७ भागांची ‘दलदल’ ही वेब सीरिज पाहू शकता. प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झालेल्या या क्राइम थ्रिलरची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावरही होत आहे.

दलदलचा टीझर

भूमी पेडणेकर नेहमीच वेगळ्या धाटणीच्या सशक्त भूमिकांसाठी व सामाजिक विषयांवर आधारित कलाकृतींसाठी ओळखली जाते. तिच्या या नवीन सीरिजने केवळ भारतातच नाही, तर अमेरिका आणि युके सारख्या देशांच्या टॉप लिस्टमध्येही स्थान मिळवलं आहे.

या ७ भागांच्या क्राइम थ्रिलरची सुरुवात मुंबईत होते. मुंबईत एकामागून एक पुरुषांच्या रहस्यमयी हत्या होतात. या केसची जबाबदारी डीसीपी रीता फरेरा (भूमी पेडणेकर) यांच्याकडे सोपवण्यात येते. विजय राज यांनीही सीरिजमध्ये काम केलं आहे. ते नेहमीप्रमाणेच एका अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रभावी भूमिकेत आहेत. त्यांच्या अभिनयामुळे सीरिजमधील गांभीर्य अधिक वाढले आहे. त्याचबरोबर ‘मिर्झापूर’ फेम प्रियांशु पैन्युलीने या सीरिजमध्ये एका महत्त्वपूर्ण पात्राची भूमिका बजावली आहे. या सीरिजचे दिग्दर्शन अमृत राज गुप्ता यांनी केले असून, ही सीरिज विशाखा बहल यांच्या ‘सर्कल ऑफ थ्री’ (Circle of Three) या कादंबरीवर आधारित आहे.

प्रेक्षक आणि समीक्षकांकडून या सीरिजला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळे तुम्हीही अमेझॉन प्राइम व्हिडीओवर ही सीरिज नक्की पाहू शकता.