बरेच लोक दर आठवड्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या सीरिज आणि चित्रपटांची वाट पाहत असतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका वेब सीरिजला सध्या प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. या सीरिजची प्रेक्षकांमधील क्रेझ वाढतच आहे आणि म्हणूनच तिने टॉप ट्रेंडिंग लिस्टमध्ये स्थान मिळवलं आहे. ही ७ भागांची सीरिज पाहताना तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही.

आम्ही ज्या वेब सीरिजबद्दल बोलतोय, ती शुक्रवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. या सीरिजची कथा एका सिरीयल किलरभोवती फिरते जो मुंबईत एकामागून एक हत्या करत असतो. विशेष म्हणजे, तो फक्त पुरुषांनाच मारतो. त्याच्या हत्या करण्याच्या विचित्र पद्धती पाहून तुमचं डोकं चक्रावेल.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेंडिंग आहे सीरिज

या सीरिजचं नाव आहे दलदल. ही सीरिज प्राइम व्हिडीओवर रिलीज झाली आहे. ‘दलदल’ (Daldal) ही भूमी पेडणेकरची अत्यंत बहुप्रतिक्षित क्राईम-थ्रिलर वेब सीरिज आहे. या सीरिजमधून भूमीने एक अतिशय दमदार भूमिका साकारून ओटीटीवर पदार्पण केलं आहे. या सीरिजची कथा अनिश देब यांच्या ‘पोटॅश’ (Potash) या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे. यात भूमी पेडणेकर रीता फरेरा नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.

या कथेत सस्पेन्सचा पूर्ण डोस मिळतो. रीता फरेरा ही मुंबईतील एका सिरियल किलरचा शोध घेत असते. खुन्याला पकडण्यासाठी तिच्या नेतृत्वाखाली एक टीम तैनात केली जाते. पण खूनी प्रचंड हुशार असतो, तो पोलिसांना चकवा देण्यास यशस्वी होतो. रीता स्वतःच्या आयुष्यातील जुन्या दुखांशी आणि मानसिक तणावाशी झुंज देत असतानाच या अत्यंत गुंतागुंतीच्या केसमध्ये अडकते. सीरिज पाहताना काही वेळा तुम्हाला असं वाटेल की या सर्व घटनांसाठी महिला पोलीस अधिकारी जबाबदार आहे, परंतु नंतर, सस्पेन्स अधिकच वाढतो आणि संपूर्ण कथा बदलते.

पाहा दलदलचा ट्रेलर

तुम्हाला जर भूमी पेडणेकरची ‘दलदल’ सीरिज पाहायची असेल तर ती प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात. या सीरिजला चाहते आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. दलदल सध्या पहिल्या क्रमांकावर ट्रेंडिंग आहे.

दलदलमध्ये भूमी पहिल्यांदाच एका धाडसी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे, ज्यासाठी तिने विशेष तयारी केली आहे. ही सीरिज केवळ गुन्हेगारीवर आधारित नसून मानवी मानसिकतेच्या खोलवर गेलेली भयंकर कथा आहे.