scorecardresearch

शाहरुखच्या ‘पठाण’बाबत उच्च न्यायालयाचे आदेश, ओटीटी प्रदर्शनाआधी करावे लागणार ‘हे’ बदल

‘पठाण’ ओटीटीवर प्रदर्शित करण्याआधी निर्मात्यांना चित्रपटात करावे लागणार बदल, दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

शाहरुखच्या ‘पठाण’बाबत उच्च न्यायालयाचे आदेश, ओटीटी प्रदर्शनाआधी करावे लागणार ‘हे’ बदल
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा चित्रपट ‘पठाण’ प्रदर्शनाआधीच सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. एकीकडे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत कमालीची क्रेझ पाहायला मिळतेय तर दुसरीकडे या चित्रपटाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने यशराज फिल्मला काही बदल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने दिलेले हे आदेश चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनासंदर्भात आहे. त्यामुळे आता निर्मात्यांना ओटीटी प्रदर्शनाआधी चित्रपटात हे बदल करावे लागणार आहेत.

दृष्टिहीन प्रेक्षकांनाही चित्रपटाचा आनंद घेता यावा यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने ‘पठाण’च्या ओटीटी प्रदर्शनासाठी हिंदी भाषेत ऑडिओ वर्णन, क्लोज कॅप्शन आणि उप-शीर्षके तयार करण्यास सांगितले आहे. चित्रपटात हे आवश्यक बदल केल्यानंतर, न्यायालयाने निर्मात्यांना चित्रपट पुन्हा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सीबीएफसीकडे सादर करण्यास सांगितलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने यशराज फिल्म्सला नवीन गाइडलाइन्स दिल्या आहेत, मात्र त्या पठाणच्या थिएटर प्रदर्शनासाठी नसून ओटीटी प्रदर्शनासाठी आहेत.

आणखी वाचा-‘पठाण’चा ट्रेलर झळकला बुर्ज खलिफावर, शाहरुख खानचा उत्साह पाहून चाहते थक्क

दिल्ली उच्च न्यायालयाने प्रोडक्शन हाऊसला चित्रपटात काही नवीन गोष्टी जोडण्यास सांगितलं आहे. खरं तर, दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या या नोटीसनंतर, ‘पठाण’ च्या निर्मात्यांना गाइडलाइन्सचं पालन करावं लागेल आणि चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी CBFC कडे पुन्हा प्रमाणपत्रासाठी पाठवण्यापूर्वी आवश्यक आवश्यक ते बदल करावे लागणार आहेत.

आणखी वाचा- ‘पठाण’ चित्रपटातील ‘ही’ गोष्ट शाहरुख खानला सर्वात जास्त आवडली, खुलासा करत अभिनेता म्हणाला…

दरम्यान ‘पठाण’ चित्रपट येत्या २५ जानेवारीला हिंदीबरोबरच तमिळ, तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख व्यतिरिक्त दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट सातत्याने चर्चेत आहे, काही लोकांनी ‘बेशरम रंग’ गाण्यात दीपिका पदुकोणने घातलेल्या भगव्या बिकिनीवर आक्षेप घेतल्यानंतर बराच वादही झाला होता.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 10:07 IST

संबंधित बातम्या