अलीकडच्या काळात प्रेक्षकांमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल क्रेझ वाढली आहे. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक तयार झाले आहेत. तर काही चित्रपट हिंदीत डब करून रिलीज करण्यात आले. दाक्षिणात्य स्टार्स आता पॅन इंडिया चित्रपट करण्यावर भर देतात. आज आम्ही तुम्हाला प्राइम व्हिडीओवरील अशाच एका ट्रेंडिंग चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. या चित्रपटात कलाकारांची मांदियाळी आहे. तसेच चित्रपट सामाजिक विषयावर बेतलेला आहे.

या चित्रपटाचं नाव आहे ढंडोरा. हा तेलुगू चित्रपट आहे. या चित्रपटात वाजी, बिंदु माधवी, नवदीप, नंदू, रवी कृष्ण, मनिका चिक्कला या कलाकारांनी काम केलं आहे. आयएमडीबीवर जबरदस्त रेटिंग असलेल्या या चित्रपटाची कथा नेमकी काय आहे, ते जाणून घेऊयात.

ढंडोरा हा चित्रपट २५ डिसेंबर २०२५ थिएटर्समध्ये आणि १४ जानेवारी २०२६ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. हा चित्रपट प्रामुख्याने जातीय भेदभाव आणि ग्रामीण भागातील सामाजिक उतरंडीवर भाष्य करतो.

Award Banner

भारतीय चित्रपटसृष्टीत जातीवाद, आंतरजातीय विवाह आणि प्रेमावर आधारित असंख्य चित्रपटांची निर्मिती झाली आहे. मराठी चित्रपट सैराट आणि हिंदी चित्रपट धडक आणि धडक २ हे समान विषयांवर आधारित लोकप्रिय चित्रपट आहेत. असाच एक तेलुगू चित्रपट, ढंडोराने देखील लक्ष वेधून घेतलं. हा अडीच तासांचा चित्रपट आहे. चित्रपटाची पार्श्वभूमी २००४ मध्ये सेट केली आहे. चित्रपटात दोन प्रेमकथा आणि जातीवर आधारित कथा दाखवण्यात आली आहे.

ठंडोराची कथा

चित्रपटाची कथा जातीयवाद, जातींमधील फरक आणि गावात राहणारे लोक यावर बेतलेली आहे. ही कथा वरच्या जातीतील जमीनदार शिवाजीभोवती फिरते. शिवाजीला एक मुलगी, सुजाता आहे. ती रवी नावाच्या खालच्या जातीतील मुलावर प्रेम करते. शिवाजीला हे कळतं तेव्हा तो एक मोठा निर्णय घेतो, ज्यामुळे कथेत एक मोठा ट्विस्ट येतो.

विचार करायला भाग पाडणारी दृश्ये

चित्रपटाच्या सुरुवातीला, एका वृद्ध महिलेचा मृतदेह दोरीने बांधून खाली उतरवला जातानाचे दृश्य आहे. नंतर, असं समजतं की मृतदेह ज्या मार्गाने न्यायचा होता, तिथे कोणीतरी मंदिर बांधलंय. त्यामुळे खालच्या जातीतील लोक तिथून जाऊ शकत नाही. चित्रपटात अशी अनेक दृश्ये आहेत जी तुम्हाला जातीवादाचं भीषण वास्तव दाखवतात. ढंडोरा चित्रपटाला आयएमडीबीवर ८.३ रेटिंग मिळाले आहे.

ढंडोरा हा चित्रपट सध्या प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. समीक्षकांनी या चित्रपटाची तुलना ‘जय भीम’ सारख्या वास्तववादी चित्रपटांशी केली असून, अभिनेता शिवाजीच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले आहे. तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर घरबसल्या पाहू शकता.