Dhurandhar on OTT: धुरंधर हा सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. इतकेच नाही तर या सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडत नवीन रेकॉर्ड केले. धुरंधर हा सर्वाधिक कमाई करणारा बॉलीवूड चित्रपट ठरला.

थिएटरमध्ये जवळजवळ दोन महिने प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा आज(३० जानेवारी २०२६) ला प्रदर्शित झाला आहे. मात्र ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. नेमकं काय घडलं, हे जाणून घेऊ…

चित्रपट ओटीटीवर आल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला. तर अनेकांनी एक्स या माध्यमावर लिहिले की हा चित्रपट ९ मिनिटांनी कमी केला आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. याचे कारण म्हणजे आशुतोष गोवारीकर यांच्या जोधा अकबर या चित्रपटानंतर हा सर्वात लांबीचा चित्रपट आहे.

डायलॉग म्यूट केल्याने प्रेक्षकांनी व्यक्त केली निराशा

थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या धुरंधर सिनेमा हा ३ तास ३४ मिनिटांचा होता. तर नेटफ्लिक्सवर पोस्ट-क्रेडिटसह चित्रपट आता ३ तास ​​२५ मिनिटांचा आहे. याबरोबरच, काही डायलॉग म्युट केले आहेत. त्यामुळे प्रेक्षक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. अनेकांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे. डायलॉग म्यूट केल्याने प्रेक्षकांनी निराशा व्यक्त केली आहे.

एकाने नेटफ्लिक्स इंडियाला टॅग करत लिहिले, “धुरंधरमधील अपशब्द म्युट का केले आहेत? जर कोणताही चित्रपट योग्यरित्या एन्जॉय करू शकत नाही तर काय फायदा? तुम्ही कोणत्याही इंग्रजी चित्रपटातील अपशब्द सेन्सॉर करता का? नाही, मग हा भेदभाव का?”

What’s wrong with #Dhurandhar ‘s Netflix version?! There are nearly 10 minutes reduction in duration and so many scenes look different from theatrical version. Look at this for an example. Thank god watched it 2 times in cinemas! #DhurandharOnNetflix #Netflix pic.twitter.com/PRlMlL83CU— Sandy (@sandyy_2910) January 29, 2026

एकाने लिहिले, “निर्मात्यांनी खरोखरच आम्हाला फसवले आहे. जर तुम्ही सगळं म्युट करणार असाल, तर तुम्ही ए सर्टिफिकेट का देता? इन सेन्सॉरशिप हा निव्वळ विनोद आहे, बाकी काही नाही.”

Why the fuɔk Dhurandhar is so heavily censored on Netflix‽

Despite holding an ‘A’ (Adults only) rating, the streaming version features muted dialogues — censored swear words, abuses, and in some cases, even crucial dialogues are muted, and approximately 10 minutes of edited… pic.twitter.com/M7IWyyYD3C— 卂乇 (@imAlter_Ego) January 30, 2026

एकाने थिएटरमधील चित्रपटाचा वेळ आणि ओटीटीवर चित्रपटाचा वेळ सांगत लिहिले की असे दिसत आहे की ओटीटीच्या प्रेक्षकांसाठी काही महत्वाचे सीन कट केले आहेत. एकाने लिहिले, “ए रेटेड चित्रपटाला सेन्सॉर करणे हा एक विनोद आहे तर अ‍ॅनिमल आणि कबीर सिंगमध्ये कोणतेही कट नाहीत. नेटफ्लिक्सने निराशा केली .” आणखी एकाने लिहिले, “नेटफ्लिक्सने सगळा मूड खराब केला.”

या सगळ्यावर चित्रपटाचे दिग्दर्शक किंवा निर्माते यांनी कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिली नाही. ते यावर काय स्पष्टीकरण देतील, हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

दरम्यान, धुरंधरने बॉक्स ऑफिसवर ८९०.६७ कोटींची कमाई केली आहे. याबरोबरच, संपूर्ण जगभरात या चित्रपटाने १४२८ कोटींची कमाई केली आहे.