scorecardresearch

Video: …आणि अशा प्रकारे रोहित शेट्टीने भरधाव गाडी हवेत उडवली, शूटिंगदरम्यानचा चित्तथरारक व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ पाहून सर्वजण आवक् झाले आहेत.

Video: …आणि अशा प्रकारे रोहित शेट्टीने भरधाव गाडी हवेत उडवली, शूटिंगदरम्यानचा चित्तथरारक व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या स्टंटबाजीसाठी ओळखला जातो. त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये कलाकार खतरनाक स्टंट करताना दिसतात. त्याच्या चित्रपटात तो अनेकदा वेगाने धावणाऱ्या गाड्यांना हवेत उडवताना दिसतो. रोहितच्या या शैलीची नेहमीच चर्चा होत असते. आता तो हे कसं करतो याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

रोहित शेट्टी सध्या त्याच्या आगामी ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सिरिजमुळे चर्चेत आहे. गेले अनेक दिवस तो या सिरिजच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या सिरीजचं शूटिंग हैद्राबादमध्ये सुरू आहे. आता या सिरिजच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ त्याने स्वतः त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत रोहित भरधाव धावणारी एका क्षणात कसा उडवतो हे पाहायला मिळतंय.

आणखी वाचा : “मला नाही वाटत हा चित्रपट…”; ‘पठाण’चं कलेक्शन पाहून ‘KGF’च्या निर्मात्यांनी केलं मोठं वक्तव्य

रोहितने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसतंय की, रस्त्यावर धावणारी एक पिवळ्या गाडी वेगात आहे आणि ती समोरच्या गाडीला ठोकते. नंतर ती गाडी हवेत उडून जमिनीवर आदळते आणि उलटी पडते. हे सगळं सुरू असताना रोहित एका ओपन जीपमध्ये मागे बसून हा सगळा सीन त्याच्या कॅमेऱ्यात शूट करतो. शूट चांगलं झाल्याने रोहित आनंदी असतो. तो हात उंचावून शॉट ओके झालाय असं सर्वांना सांगतो. आता त्याचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा : ‘इंडियन पुलिस फोर्स’च्या चित्रीकरणादरम्यान रोहित शेट्टी जखमी, दिग्दर्शकाच्या हाताची झाली सर्जरी

मध्यंतरी याच सिरीजच्या शूटिंगदरम्यान रोहित शेट्टी जखमी झाला होता. या सिरीजमधील कारच्या एका सिक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान रोहित शेट्टीच्या हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर प्रॉडक्शन टीमने त्याची हैद्राबादच्या कामिनेनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया केली आणि रोहित शेट्टीला लगेच डिस्चार्जही देण्यात आला. या सिरीजच्या माध्यमातून रोहित शेट्टी पहिल्यांदाच वेब सिरीज या माध्यमात पदार्पण करणार आहे. या सिरीजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय, शिल्पा शेट्टी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 11:03 IST