Disturbing Movies on OTT: आपण मनोरंजनासाठी चित्रपट पाहतो. आधी कोणताही नवीन चित्रपट आला की तो पाहण्यासाठी चित्रपटगृहात जावं लागायचं आता, घरात बसून तुम्ही जगभरातील अनेक नवनवीन सिनेमे ओटीटीवर पाहू शकता. अनेक चित्रपट वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. काही चित्रपट खूपच मनोरंजन करणारे असतात, पण काही चित्रपट मन हेलावून टाकणारे असतात, त्याचा तुमच्या मनावर खोलवर परिणाम होतो. ते पाहिल्यानंतर तुम्ही अस्वस्थ होऊ शकता आणि ते परिणाम तुमच्या मनावर दीर्घकाळ राहतात. काही धाडसी लोक असतात जे असे चित्रपट पाहू शकतात. तुम्हीही त्या धाडसी लोकांपैकी असाल तर ओटीटीवर हे तीन भयंकर सिनेमे उपलब्ध आहेत. डॉगटूथ (Dogtooth) हा एक ग्रीक चित्रपट आहे, ज्यामध्ये एका विखुरलेल्या कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. यातील बाप आपल्या मुलांसाठी काय चांगलं, काय वाईट ते ठरवतो आणि त्यांना बाहेरच्या वाईट जगापासून वाचवण्यासाठी घरातच ठेवण्याचा प्रयत्न करतो. ही मुलं वास्तविक जगापासून अनभिज्ञ असतात व एक खोटं जीवन जगत असतात. जसजसे ते मोठे होतात, तसतसं त्यांना घरातील हे वातावरण खटकतं व मग अशी कृत्ये करतात जे पाहून धक्का बसतो. या सिनेमात मन विचलित करणारी अनेक दृश्ये आहेत. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी द लास्ट हाउस ऑन द लेफ्ट (The Last House on The Left) हा चित्रपट १९७२ साली आला होता व खूप वादग्रस्त ठरला होता. हा एक भयपट चित्रपट आहे, ज्यात मेरी कॉलिंगवूड आणि तिची मैत्रीण फिलिस यांची गोष्ट सांगण्यात आली आहे. मेरीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शहरात जाताना वाटेत त्यांचा एका गुन्हेगारांच्या टोळीशी त्यांचा सामना होतो. ते दोघींचे अपहरण करतात, त्यांच्यावर अत्याचार करतात आणि नंतर त्यांची हत्या करतात. या चित्रपटावर त्या काळात बंदी घालण्यात आली होती. २००९ मध्ये त्याचा रिमेक आला होता, पण मूळ चित्रपटच जास्त चांगला होता असं मत काही लोकांनी व्यक्त केलं होतं. हा सिनेमा Plex वर उपलब्ध आहे. द लास्ट हाउस ऑन द लेफ्टमधील एक दृश्य (फोटो- स्क्रीनशॉट) ट्विंकल खन्नाने अंडरवर्ल्ड डॉनच्या पार्टीत केला होता डान्स? प्रतिक्रिया देत म्हणाली, “दाऊदने…” इनफिनिटी पूल (Infinity Pool) हा सिनेमा प्रवाशांवर झालेल्या गुन्ह्यांवर आधारित आहे. एक कादंबरीकार जेम्स फॉस्टर व त्याची पत्नी फिरायला जातात, तिथे त्यांना जेम्सची चाहती गॅबी व तिचा नवरा अल्बान भेटतात. गॅबी व अल्बानमुळे जेम्सच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी येऊ लागतात, मग जेम्स चुकून एक खून करतो. यासाठी जेम्सला जी शिक्षा मिळते ती पाहणं खूप कठीण आहे. तुम्हाला हा सिनेमा पाहायचा असेल तर तो जिओ सिनेमावर उपलब्ध आहे.