टी सीरिजचे मालक भूषण कुमार (Bhushan Kumar) यांची पत्नी दिव्या खोसला कुमार ही सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शक व निर्माती आहे. काही महिन्यांपूर्वी तिने आपल्या सासरचं आडनाव सोशल मीडिया अकाउंटवरून हटवलं, यानंतर तिच्या वैवाहिक जीवनात सगळं सुरळीत नसल्याची चर्चा होऊ लागली. पती भूषण कुमार यांच्याबरोबर बिनसल्याने तिने ‘कुमार’ आडनाव हटवलं आहे, अशा अफवा पसरल्या. आता अभिनेत्रीने त्याबाबत मौन सोडलं आहे.

‘बॉलीवूड शादी डॉट कॉम’च्या रिपोर्टनुसार, काही महिन्यांपूर्वी पतीचे आडनाव ‘कुमार’ का काढून टाकले होते, यामागचे कारण आता दिव्या खोसलाने सांगितले आहे. एका ज्योतिषाने तिला सल्ला दिला होता की तिने तिच्या नावातून पतीचे आडनाव ‘कुमार’ काढून टाकल्यास तिला करिअरमध्ये पुढे जाण्यास मदत होईल. तिने तेच केलं आणि या बदलाचे बदलाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत, असं ती म्हणाली.

Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
article about veteran film critic and author aruna vasudev
व्यक्तिवेध : अरुणा वासुदेव
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
Akhil Akkineni net worth
९ वर्षांचे करिअर अन् फक्त एकच हिट चित्रपट, तरीही कोटींमध्ये फी घेतो अभिनेता; ‘या’ अभिनेत्याचा आहे सावत्र भाऊ
Film critic Aruna Vasudev passed away
चित्रपट समीक्षक अरुणा वासुदेव यांचे निधन
actress delnaaz irani boyfriend percy
१४ वर्षांचा संसार मोडला, १० वर्षांनी लहान व्यक्तीच्या प्रेमात आहे लोकप्रिय अभिनेत्री, पतीनेही केलंय दुसरं लग्न
Mardaani 3 Movie Announcement
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ चित्रपटाची घोषणा

लग्नाला झाली १० वर्षे, आई होऊ शकत नाहीये प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, “माझ्या अन् पतीच्या वयातील अंतरामुळे…”

दिव्याने पतीचं आडनाव हटवण्यासोबतच तिच्या ‘खोसला’ आडनावाच्या स्पेलिंगमध्ये अतिरिक्त ‘s’ जोडला आहे. हे सर्व तिने संजय बी जुमानी या ज्योतिषांनी दिलेल्या सल्लानुसार केलं आहे. दिव्याच्या मते, तिने सासरचं आडनाव हटवल्यावर तिला फायदा झाला आहे. दिव्या खोसला व हर्षवर्धन राणे यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘सावी’ सिनेमा ३१ मे २०२४ रोजी रिलीज झाला होता. दोन महिन्यांहून जास्त काळानंतरही तो नेटफ्लिक्सवर नंबर 1 वर ट्रेंड करत आहे. हा चित्रपट १५ देशांमध्ये ट्रेंड करत असून जबरदस्त कामगिरी करत आहे.

वयात १४ वर्षांचे अंतर अन् लग्नानंतर ५ वर्षांनी झाले आई-बाबा; सेलिब्रिटी जोडप्याने दाखवले जुळ्या बाळांचे चेहरे, पाहा Photos

दिव्याने आडनाव हटवल्यावर भूषण कुमार यांची प्रतिक्रिया

फेब्रुवारी २०२४ मध्ये दिव्याने तिच्या नावातून ‘कुमार’ हे आडनाव काढून टाकले. यानंतर दिव्या आणि भूषण यांच्या वैवाहिक जीवनात काही आलबेल नसून त्यांचा घटस्फोट होऊ शकतो, अशा चर्चा झाल्या. त्याबद्दल भूषण कुमार यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. “दिव्याने ज्योतिषशास्त्रीय कारणांमुळे तिचं नाव बदललं आहे. मी या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, पण ती ठेवते,” असं ते म्हणाले होते.

Divya Khossla husband bhushan Kumar
दिव्या खोसला व भुषण कुमार (फोटो – इन्स्टाग्राम)

Bigg Boss Marathi: पहिल्याच आठवड्यात ‘हा’ स्पर्धक बिग बॉसच्या घराबाहेर, छोटा पुढारी झाला भावुक

जम्मूमध्ये साधेपणाने केलं होतं लग्न

‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिव्या खोसला पहिल्यांदा भूषण कुमार यांना भेटली होती. दिव्याला पाहताच भूषण प्रेमात पडले. दिव्या नात्यासाठी तयार नव्हती, पण भूषण यांनी तिचं मन जिंकलं आणि त्यांनी १३ फेब्रुवारी २००५ रोजी जम्मूमध्ये वैष्णोदेवी मंदिरात लग्न केलं होतं. साधेपणाने लग्न केल्यावर दोन रिसेप्शन झाले होते, ज्यात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. लग्नानंतर सहा वर्षांनी २०११ मध्ये दिव्या व भूषण आई-बाबा झाले. त्यांच्या मुलाचे नाव रुहान आहे.