अलीकडच्या काळात अनेक निर्माते चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्याऐवजी ओटीटीवर रिलीज करण्याला प्राधान्य देत आहेत. त्याचं कारण म्हणजे प्रेक्षकांमध्ये असलेली ओटीटीची क्रेझ. अनेक सस्पेन्स थ्रिलर, मिस्ट्री व अॅक्शन चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतात. या सीरिज व चित्रपट ट्रेंडिंग असतात.

ओटीटी प्लॅटफॉर्मची वाढती क्रेझ निर्मात्यांना नवीन चित्रपट आणि मालिका तयार करण्यास भाग पाडत आहेत. लोक ओटीटी प्लॅटफॉर्मवर सस्पेन्स, मिस्ट्री थ्रिलर्स चित्रपट आणि सीरिज बघण्यास उत्सुक असतात. आज आम्ही अशाच एका दमदार चित्रपटाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, या चित्रपटाची कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. या चित्रपटाचं नाव काय आणि तो कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता, ते जाणून घेऊयात.

या चित्रपटाचे नाव काय?

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर येताच, हा चित्रपट ट्रेंडिंग लिस्टमध्ये आला आहे. ‘एको’ (Eko) असं या मल्याळम चित्रपटाचं नाव आहे. एको नावाच्या या चित्रपटाची कथा एका बेपत्ता झालेल्या बिझनेसमनच्या शोधाभोवती फिरते. एको नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटाबद्दल लोक त्यांची मतं व्यक्त करत आहेत. जर तुम्ही अद्याप हा चित्रपट पाहिला नसेल, तर तुम्ही नेटफ्लिक्सवर तो घरबसल्या पाहू शकता.

IMDb रेटिंगच्या बाबतीतही ‘एको’ने इतर अनेक चित्रपटांना मागे टाकलं आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर १० पैकी ८.२ रेटिंग मिळाले आहे. या मिस्ट्री-थ्रिलर सिनेमात अनेक रहस्ये दाखवण्यात आली आहेत. ही रहस्ये प्रेक्षकांना देखील फार आवडली आहेत. २ तास ५ मिनिटांचा हा चित्रपट कोणत्याही ब्रेकशिवाय तुम्ही एकदाच पाहू शकता. चित्रपटाची कथा इतकी रंजक आहे की हा चित्रपट पाहताना स्क्रीनवरून तुमची नजर हटणार नाही. त्याबरोबर हा चित्रपट पाहताना तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही.

तुम्हाला जर मिस्ट्री थ्रिलर्स, सस्पेन्सफुल स्टोरीज आणि ट्विस्ट्सचे चाहते असाल, तर एको हा चित्रपट नेटफ्लिक्सवर नक्की पाहा. खरं तर ओटीटीवर कोणता चित्रपट पाहावा, हे ठरत नसेल तर एको तुमच्या वॉचलिस्टमध्ये नक्कीच असायला हवा. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिट झाला आहे आणि वीकेंडला तो पाहणं म्हणजे पर्वणी ठरू शकते.