ekta kapoor shared instagram post cyptic dig at karan johar gandii baat alt balaji lust stories spg 93 | "तुमची ती 'लस्ट स्टोरी' आम्ही केलं...." एकता कपूरने साधला निशाणा | Loksatta

“तुमची ती ‘लस्ट स्टोरी’ आम्ही केलं….” एकता कपूरने साधला निशाणा

xxx या वेबसीरिजवरून तिच्यावर टीका करण्यात आली होती

“तुमची ती ‘लस्ट स्टोरी’ आम्ही केलं….” एकता कपूरने साधला निशाणा
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

टीव्ही विश्वातील एकता कपूर हे मोठं नाव आहे. गेली अनेकवर्ष एकता कपूर मालिका विश्वात कार्यरत आहे. मालिकांमधील यशानंतर तिने चित्रपटांची निर्मिती केली. सध्या जमाना आहे तो ओटीटी माध्यमाचा, या माध्यमात तिने आपले पाऊल ठेवले आहे. ‘xxx’ या तिच्या वेबसीरिजवरून सर्वोच्च न्यायालयाने तिला खडसावले होते. याच प्रकरणावरून तिने आता भाष्य केले आहे.

एकता कपूर सोशल मीडियावर सक्रीय नसते किंवा आपल्या वक्तव्यांसाठीदेखील प्रसिद्ध नाही. ‘xxx’ या वेबसीरिजवरून तिच्यावर टीका करण्यात आली होती. नुकतीच तिने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत करण जोहरवर नाव न घेता निशाणा साधला आहे. तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहले आहे ‘तुम्ही केलं तर लस्ट स्टोरी आणि आम्ही केलं तर गन्दी बात, दुट्टपीपणा’ अशा शब्दात तिने टोला लगावला आहे.

“चित्रपटाला वल्गर म्हणणाऱ्यांच्या विरोधात…” ‘द काश्मीर फाइल्स’ वादावर पल्लवी जोशींनी मांडली भूमिका

‘लस्ट स्टोरीज’ ही वेबसीरिज चार भागांची होती. ज्यात सेक्स, शारीरिक जवळीक यावर भाष्य करणाऱ्या कथा होत्या. या चार भागांचे दिग्दर्शन अनुराग कश्यप, झोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी, करण जोहर या दिग्दर्शकांनी केले होते. यात कियारा अडवाणी, राधिका आपटे, आकाश ठोसर, भूमि पेडणेकर, विकी कौशल, नेहा धूपिया हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

‘गुडबाय’ हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट, या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर हिने केली आहे. हिंदुस्तानी भाऊने या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे प्रेक्षकांना आवाहन केले होते. नुकतेच त्याने इन्स्टाग्रामवर एक लाईव्ह सेशन केले, त्यात त्याने एकता कपूरबद्दलची मतं मांडत तिला खडे बोल सुनावले होते.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 12:52 IST
Next Story
“एवढी सोन्यासारखी बायको असताना…” विकी कौशल आणि कियारा आडवाणीचा बाथटबमधील रोमान्स पाहून नेटकऱ्यांचा संताप