Watch This Hollywood’s Horror Movie On OTT : हॉलीवूडमध्ये आतापर्यंत अनेक हॉरर चित्रपट बनले आहेत. ओटीटीमुळे तर विविध जॉनरचे आणि विविध भाषेतील चित्रपट व सीरिज घरबसल्या पाहता येतात. अशातच जर तुम्हालासुद्धा हॉरर या जॉनरची आवड असेल तर आम्ही तुम्हाला एका अशा हॉरर चित्रपटाबद्दल सांगणार आहोत जो सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे.
हा एक असा चित्रपट आहे जो पाहताना तुमच्या अंगावर शहारे येतील. यातील प्रत्येक सीनमध्ये रहस्य आहे. ज्यामुळे तुमच्या हृदयाची धडधड वाढेल. या चित्रपटाचं नाव आहे ‘इविल डेड’. हा चित्रपट ओटीटीवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या चित्रपटाबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
चित्रपटाची कथा
इविल डेड हा अमेरिकन चित्रपट १९८१च्या द इविल डेड या चित्रपटाचा रिमेक आहे आणि त्याच फ्रँचायझीचा चौथा भाग आहे. २०१३मध्ये हा चित्रपट रिलीज झालेला. या चित्रपटाची कथा ५ मित्रांभोवती फिरते, जे एका जे एका ओसाड जागी त्यांची मैत्रीण मियाचं व्यसन थांबवण्यासाठी थांबलेले असतात. तिथे त्यांना एका जुनं पुस्तक सापडतं. त्या पुस्तकाचं नाव आहे ‘बुक ऑफ द डेड’. जेव्हा नकळत ते लोक हे पुस्तक वाचायला लागतात तेव्हा तिथे असलेले राक्षस एक एक करुन जागे होतात आणि त्या मुलांचा शिकार करण्याचा प्रयत्न करतात. या चित्रपटात रक्तपात आणि भयानक दृश्ये आहेत.
चित्रपटाची कास्ट
हॉरर चित्रपट ‘इव्हिल डेड’चे दिग्दर्शन फेडे अल्वारेझ यांनी केले आहे. मुख्य भूमिकांमध्ये जेन लेवी (मिया), शिलो फर्नांडिस, जेसिका लुकास आणि लू टेलर पुची यांसारखे कलाकार आहेत, ज्यांनी चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला आहे.
चित्रपटाचं बजेट आणि कलेक्शन
‘इविल डेड’ या चित्रपटाचं बजेट १७ मिलियन म्हणजेच १७ कोटी इतकं होतं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटानं तेव्हा जगभरात ९७.५ मिलियन डॉलर इतकी कमाई केली होती.
ओटीटीवर कुठे पाहायचा?
एक तास ३१ मिनिटांचा हा हॉरर आणि रहस्यमय चित्रपट तुम्ही ओटीटीवर ‘झी ५’वर पाहू शकता. आयएमडीबीवर ‘इविल डेड’ या चित्रपटाला६.५ इतकी रेटिंग आहे. जर तुम्हाला काहीतरी नवीन आणि भयावह हॉरर पाहायचं असेल तर तुम्ही हा चित्रपट घरबसल्या पाहू शकता.
