Lock Upp 2 Judgement Day live : ‘नेटफ्लिक्स’वरील ‘लॉक अप २’ हा ओटीटी शो जोरदार चर्चेमध्ये आला आहे. या शोमध्ये मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शिंदे सहभागी झाल्यानंतर रंगत वाढली आहे. शिल्पाने अनेक धक्कादायक खुलासे केले असून तिचे इतर स्पर्धकांसह वाद होत आहेत. मात्र, शिल्पा शिंदेने इन्फ्लुएन्सर शिवांगी जोशीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकली आहे. यावरून नेटकऱ्यांनी जोरदार टीका केल्यानंतर शोच्या सूत्रसंचालक व निर्मात्यांवर राग व्यक्त केला आहे. यावर अखेर फराह खान व्यक्त झाली असून तिने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.
शिवांगी जोशीच्या व्हिर्जिनिटीबाबत आणि रिलेशनशिपबाबत शिल्पा शिंदेने वक्तव्य केल्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तिच्या या वक्तव्यावरून फक्त शिल्पा नाही तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक फराह खान व रितेश देशमुख यांना टॅग करीत नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. शिल्पाच्या वागण्याबद्दल आणि बोलण्याबद्दल तिला कडक शब्दांमध्ये समज देण्याची इच्छा नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. एकाने सोशल मीडियावर पोस्ट करीत फराह, रितेश आणि एकता कपूर यांना शिल्पाच्या वागण्यावरून लक्ष्य केले. यावर आता फराहने कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे नेटकऱ्याची पोस्ट?
“एकता, फराह, रितेश, नेटफ्लिक्स आणि तुमच्या ८४ कॅमेऱ्यांनी काम करणं बंद केलं आहे का? श्रेया आणि शिल्पा शिवांगीबद्दल करत असलेल्या घाणेरड्या कमेंट्स तुम्हाला दिसत नाहीत का? त्या एका मुलीच्या चारित्र्याबद्दल इंटरनॅशनल शोमध्ये सातत्याने खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत आणि तुम्ही त्यांना याबद्दल जाबही विचारत नाही. आकांक्षाच्या चुकीवर प्रत्येक मुद्दा उचलून धरला गेला, मग शिल्पा आणि श्रेयाच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष का केलं जात आहे? त्यांचं वक्तव्य तर अधिक गंभीर आहे. मुद्दाम हा पक्षपाती का?” असा थेट प्रश्न उपस्थित करीत नेटकऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट केली. यावर फराह खानने ऑफिशियल अकाउंटवरून प्रतिक्रिया दिली आहे.
फराह खानने दिली प्रतिक्रिया
शिल्पा शिंदेच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरू झाल्याने फराह खानने या पोस्टवर कमेंट केली आहे. फराह खानने लिहिलं, “कृपया ‘जजमेंट डे’ (Judgement Day) पाहा आणि त्यानंतर पत्रातून आपला राग व्यक्त करा.” शिल्पा शिंदेच्या वादग्रस्त विधानांवर शनिवारच्या ‘जजमेंट डे’मध्ये चर्चा केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या वक्तव्यावर फराह खान आणि रितेश देशमुख काय प्रतिक्रिया देणार याची चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
We'll see that too!#Yoganksha #AkankshaChoudhary #YogeshRawat #AkkuSena #Akanksharks #Yogeshians #Starboy #LockUpp2 pic.twitter.com/xhrxIr9a1A
— Dr? (@echoatic1) July 17, 2026
काय म्हणालेली शिल्पा शिंदे?
शिवांगी जोशीबद्दल शिल्पा शिंदे म्हणालेली, “हिनं जे काही शो केले आहेत, त्या प्रत्येक शोमध्ये जाऊन तिनं मुलांबरोबर अफेअरच केलं आहे. कुशाल टंडन तर तिच्यापेक्षा वयानं कितीतरी मोठा आहे, तरीही त्यांच्याबरोबर हिचं अफेअर होतं.” सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये शिल्पाने शिवांगीची मिमिक्री करीत व्हर्जिनिटीवर भाष्य केलं. शिल्पा म्हणालेली, “मी तर खूप निरागस आहे, मला तर यातलं काहीच माहीत नाही, मी तर व्हर्जिन आहे; लग्नानंतरही मी ते करणार नाही.”
