Shahid Kapoor Farzi Web Series on Prime Video: ओटीटी विश्वात काही वेब सीरिज इतक्या तुफान गाजतात की वर्षानुवर्षे त्यांचीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. अशीच एक जबरदस्त क्राइम थ्रिलर सीरिज आहे. दिग्दर्शक राज अँड डीके यांनी २०१४ मध्ये या कथेची कल्पना एका चित्रपटाच्या रूपात मांडली होती, ज्यासाठी नवाजुद्दीन सिद्दीकी आणि शाहिद कपूर यांची निवड झाली होती. मात्र, बनावट नोटांचे मोठे रॅकेट २-३ तासांच्या चित्रपटात दाखवणे शक्य नसल्याने २०१९ मध्ये या कथेचे रुपांतर वेब सीरिजमध्ये करण्यात आले.
या सीरिजचं नाव ‘फर्जी’ आहे. निर्माते राज अँड डीके यांनी २०१४ मध्ये या कथेची कल्पना एका चित्रपटाच्या रूपात केली होती. त्यावेळी मुख्य भूमिकेसाठी शाहीद कपूर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची निवड झाली होती. मात्र, काही कारणांमुळे हा प्रोजेक्ट पुढे जाऊ शकला नाही आणि बंद पडला. काही वर्षांनंतर दिग्दर्शकांना वाटलं की बनावट नोटांचे हे मोठं नेटवर्क आणि पात्रांचे विविध पैलू दोन-अडीच तासांच्या चित्रपटात दाखवणं सोपं नाही. त्यामुळे २०१९ मध्ये याची वेब सीरिज बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. याच काळात एक मोठा बदलही झाला, नवाजुद्दीन सिद्दीकीऐवजी दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीला यात घेण्यात आलं. तर मुख्य भूमिकेसाठी शाहीद कपूरलाच घेण्यात आलं.
फर्जी सीरिजची कथा
‘फर्जी’मध्ये शाहिद कपूरने ‘सनी’ नावाच्या एका कलाकाराची भूमिका केली आहे. तो परिस्थितीमुळे हतबल होऊन बनावट नोटा छापण्याचा धंदा सुरू करतो. दुसरीकडे, विजय सेतुपती एका अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत. तो बनावट नोटांचं हे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असतो. के. के. मेनन यांचीही या सीरिजमध्ये दमदार भूमिका आहे. ही सीरिज तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
‘फर्जी’ सीरिजमध्ये राशी खन्ना आणि भुवन अरोरा हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसतात. १० फेब्रुवारी २०२३ रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर ही सीरिज रिलीज झाली होती. ही आठ भागांची सीरिज आहे. ही सीरिज प्रेक्षकांना फार आवडली. फर्जीला आयएमडीबीवर ८.३ चे जबरदस्त रेटिंग मिळाले, तसेच फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्समध्ये या सीरिजला १० नामांकनंही मिळाली होती. तुम्ही जर ही सीरिज पाहिली नसेल तर या वीकेंडला नक्की पाहू शकता.
