Ott Release: येत्या शनिवारी आणि रविवारी घरी बसून ओटीटीवर सिनेमा बघण्याचा तुमचा प्लॅन आहे का? असे असेल, तर या शुक्रवारी (६ फेब्रुवारी) ओटीटीवर कोणते सिनेमे प्रदर्शित होणार आहेत, ते जाणून घेऊ….

काही तेलुगू चित्रपट आणि काही इंटरनॅशनल थ्रिलर चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहेत. तसेच, काही डॉक्युमेंट्रीदेखील प्रदर्शित होणार आहेत.

१. द राजा साब

द राजा साब या चित्रपटात लोकप्रिय अभिनेता प्रभास प्रमुख भूमिकेत आहे. या तेलुगू चित्रपटाची मोठी चर्चा झाली होती. हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. प्रभासने या चित्रपटात राजू ही भूमिका साकारली आहे.

चित्रपटाची गोष्ट राजू या तरुणाभोवती फिरते. राजूचे आजोबा हरवलेले असतात आणि राजू त्यांना शोधण्याचा निर्धार करतो. त्याच्या या प्रवासात एक ट्विस्ट येतो. त्याचे आजोबा जंगलातील एका भुताचे वास्तव्य असलेल्या वडिलोपार्जित महालात राहत असतात.

आता राजू राजू महालात रचलेल्या धोकादायक सापळ्यातून बाहेर पडू शकेल का? हे जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही द राजा साब हा चित्रपट पाहू शकता. हा चित्रपट ६ फेब्रुवारी २०२६ ला जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

२. किस किस को प्यार करूँ २

कपिल शर्माची प्रमुख भूमिका असलेला ‘किस किस को प्यार करूँ २’ हा चित्रपटदेखील शु्क्रवारी प्रदर्शित होणार आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे.

कपिल शर्माने या चित्रपटात मोहन शर्मा ही भूमिका साकारली आहे. मोहनच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात, ज्यामुळे त्याला तिघींबरोबर लग्न करावे लागते.

हा चित्रपट जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.

३. शबद: रीत और रिवाज (Shabad – Reet Aur Riwaaz)

शबद : रीत और रिवाज या चित्रपटाची गोष्ट किशोरवयीन घुप्पी नावाच्या मुलाभोवती फिरते, जो बोलताना अडखळतो. त्याला फुटबॉलर बनायचे आहे. मात्र, त्याच्या वडिलांना वाटते की, त्याने गायक व्हावे.

त्यामध्ये वडील आणि मुलाचे नाते पाहायला मिळते. मुलाची स्वप्ने आणि वडिलांच्या अपेक्षा जेव्हा समोरासमोर येतात, तेव्हा काय घडते हे या चित्रपटात पाहायला मिळते.

हा चित्रपट ६ फेब्रुवारी २०२६ ला झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.

४. सल्वाडोर (Salvador)

हा एक स्पॅनिश चित्रपट आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून, त्यामध्ये एका अॅम्ब्युलन्स चालकाची गोष्ट पाहायला मिळते. त्याची मुलगी जेव्हा एका नाझी ग्रुपमध्ये सामील झाल्याचे त्याला कळते, तेव्हा त्याला धक्का बसतो.

मुलीला तिच्या निर्णयाबद्दल समजावण्यासाठी आणि तिला त्यातून बाहेर काढण्यासाठी तो एक कठीण निर्णय घेतो. हा चित्रपट ६ फेब्रुवारी म्हणजेच शुक्रवारी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, जॅझ सिटी (Jazz City) ही १० भागांची वेब सीरिज सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. तसेच, क्वीन ऑफ चेस (Queen of Chess) ही डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. त्याबरोबरच फाइंडिंग हार्मोनी : ए किंग्ज व्हिजन (Finding Harmony: A King’s Vision) ही डॉक्युमेंट्री अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.