गेल्या काही दिवसांपासून गौरव खन्ना आणि आकांक्षा ही जोडी अनेकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. ‘लॉक अप सीझन २’मध्ये आकांक्षाने ती आणि गौरव घटस्फोट घेणार आहेत आणि गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत आहेत असा खुलासा केल्यानतंर या चर्चेला सुरुवात झाली. त्यानतंर तिने तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या. अशातच आता गौरवची या शोमध्ये एन्ट्री झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून गौरव खन्नाची शोमध्ये एन्ट्री होणार याबाबत चर्चा सुरू होती. अशातच आता समोर आलेल्या नवीन प्रोमोमध्ये त्याची ‘लॉक अप’मध्ये एन्ट्री झाल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी आकांक्षा आणि गौरव दोघेही भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. त्यांच्यातील काही खासगी गोष्टी, दुरावा या सगळ्यानंतर आता एकमेकांना पाहिल्यानंतर दोघांना अश्रू अनावर झाल्याचं या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे.
गौरव खन्नाची लॉक अपमध्ये एन्ट्री
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये गौरव शायरी म्हणत त्याचं दु:ख व्यक्त करता दिसत आहे. अभिनेता म्हणाला, “एक समंदर हे जो काबू में है, एक कतरा है जो मुझसे संभाला नही जाता. एक उम्र बितानी है उसके बगैर पर एक लम्हा है जो मुझसे गुजारा नही जाता”. यानंतर पुढे आकांक्षाचा आवाज ऐकू येतो जिथे ती म्हणते “कोणी तरी आलं आहे” आणि पुढे गौरवची एन्ट्री होताना दिसते. त्याची ‘लॉक अप’मध्ये एन्ट्री झाल्यानंतर सगळे स्पर्धक उत्सुक होतात. तर आकांक्षाही त्याच्याकडे पाहून स्मीत हास्य करते.
आकांक्षाला काय म्हणाला गौरव?
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये गौरव पुढे आकांक्षाकडे येताना दिसतो आणि तिला “बँड वाजवलास तू तर…” असं म्हणताना दिसतो. यावेळी तोसुद्धा खूप वेदनेत असल्याचं त्याच्या आवाजावरुन कळतं. तर आकांक्षालाही यावेळी अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळतं. ती तिचे अश्रू पुसत असताना गौरव पुढे तिच्याशी संवाद साधत असतो मात्र त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली ते ऐकू येत नाही. त्यामुळे येत्या भागात या जोडीची भेट, त्यांच्यातील भावनिक संवाद या सगळ्या गोष्टींसाठी त्यांचे चाहते उत्सुक आहे. तसंच या शोमध्ये दोघांमध्ये नेमकं काय होणार, गौरवच्या येण्याने कोणतं मोठं वळण येणार का हे येत्या भागात पाहायला मिळेल.
दरम्यान, खरंतर गौरव खन्नाने ‘बिग बॉस सीझन १९’मध्ये सहभाग घेतला तेव्हापासून हे दोघे विशेष करुन आकांक्षा चर्चेत आली. गौरवचा चाहतावर्ग मोठा असून तो अनेक कलाकृतींमधून झळकत असतो, पण गौरवमुळे आकांक्षाला लोकप्रियता मिळाली असंही काही जण सोशल मीडियावर म्हणताना दिसतात. ‘बिग बॉस’मध्ये त्यावेळी गौरवने त्याला मुलं हवी आहेत, त्याला पालकत्व अनुभवायचं आहे. परंतु, आकांक्षाला मुलं नको आहेत तरी तो तिच्या निर्णयाचा आदर करतो असं म्हणाला होता. तेव्हापासून खरंतर त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा व्हायला लागली. त्यानंतर आकांक्षासुद्धा ‘बिग बॉस’मध्ये आली होती तिने तिला मुल नको आहे आणि तिला आई नाही व्हायचंय असं स्पष्ट सांगितलं होतं. आता ‘लॉक अप’मध्ये आल्यानंतर मात्र तिने घटस्फोटाबद्दल सांगत त्यांच्या चाहत्यांना धक्काच दिला.
