तृतीयपंथी समाजसेविका गौरी सावंत त्यांच्या जीवनावर आधारित ‘ताली’ या वेब सीरिजमुळे सध्या चर्चेत आहेत. या सीरिजमध्ये गौरी यांची भूमिका अभिनेत्री सुश्मिता सेनने साकारली आहे. आपल्या देशात अनेक तृतीयपंथीयांचे विवाह झाले आहेत. गौरी सावंत यांचं तृतीयपंथीयांच्या लग्नाबाबत काय मत आहे, याबाबत जाणून घेऊयात.
तृतीयपंथी दाढी कसे करतात? गौरी सावंत यांनी सांगितलं वास्तव; म्हणाल्या, “ब्लेडने दाढी केली तर…”




गौरी सावंत जवळपास वर्षभरापूर्वी ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात आल्या होत्या. तेव्हा त्यांना सुबोध भावेने तृतीयपंथीयांच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं. तृतीयपंथीयांच्या लग्नाला तुमची मान्यता आहे का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर गौरी म्हणाल्या, “लग्नाला माझी वैयक्तिक मान्यता आहे. जोडीदार प्रत्येकाला हवा आहे. ती प्रत्येकाची वैयक्तिक आवड आहे. मी लग्न केलं नाही म्हणून इतरांनीही करू नये असं नाही. ज्याला जे योग्य वाटतं, ते त्यांनी करावं. आयुष्यात जोडीदार असावा असं जर त्याला वाटत असेल तर त्यांनी लग्न करावं.”
“त्यांना वाटत असेल की मी खूप…”, ‘वेलकम टू द जंगल’चा भाग नसण्याबद्दल स्पष्टच बोलले नाना पाटेकर
कारण देत पुढे गौरी सावंत म्हणतात, “आमच्या आधीच्या पिढीत गुरुजींना एकत्र जायचो, त्यामुळे ती कमतरता नव्हती. पण तुम्ही तृतीयपंथीयांना पाहिलं असेल तर ठसठशीत मंगळसूत्र वगैरे ते घालतात. लग्नाबाबत प्रत्येकाचं स्वतंत्र मत आहे, त्यामुळे त्यांना योग्य वाटतं ते त्यांनी करावं.”
“मला नग्न केलं होतं,” मराठमोळ्या सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “मला खूप तुच्छतेने…”
दरम्यान, तृतीयपंथीयांच्या आयुष्यात गुरू असणं का गरजेचं आहे याबाबत गौरी सावंत यांनी नुकतंच त्यांचं मत व्यक्त केलं. आमचे गुरु सुरुवातीला आम्हाला घर देतात. घरात छोटंस देवघर असतं. गुरु खाटेवर झोपतात इतर गुरुभाऊ खाली, प्रत्येकाने भिक मागून आणलेल्या पैशांची वाटणी केली जाते, असं त्या म्हणाल्या होत्या.