बॉलीवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा अनेकदा कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या त्या नेटफ्लिक्सवरील ‘लॉक अप सीझन २’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्या आहेत. सुनीता आहुजा नेहमीच त्यांची मतं, प्रतिक्रिया स्पष्टपणे व्यक्त करत असतात. अशताच आता या शोमध्येसुद्धा त्यांची अशी भूमिका असल्याचं दिसतं.
‘लॉक अप सीझन २’मध्ये हिंदी इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी सहभागी झाली आहेत. तर रितेश देशमुख आणि फराह खान शोचं होस्टिंग करत आहेत. अशातच आता शो सुरू झाल्यापासूनच यातील स्पर्धक वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. नुकतंच सुनीता आहुजा यांचा व्हिडीओसुद्धा समोर आला आहे. ज्यामध्ये त्या त्यांच्यावर टीका करणाऱ्यांबद्दल बोलताना दिसत आहेत.
लोकांच्या टीकेचा मला फरक पडत नाही – सुनीता आहुजा
‘लॉक अप सीझन २’मधील लेटेस्ट एपिसोडमधून समोर आलेल्या व्हिडीओत सुनीता आहुजा यांना त्यांच्यावर होणाऱ्या टीकेबद्दल विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या त्यांच्या खासगी आयुष्यात काय करतात याबद्दल इतरांना का जाणून घ्यायचं असतं असं सांगितलं. सुनिता पुढे म्हणाल्या, त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू शकतात. मला काहीच फरक पडत नाही. मी कोणाहीसाठी स्वत:ला बदलणार नाही. खरी गोष्ट ही आहे की कोणीच कोणाला सुखी असलेलं पाहू शकत नाही”.
सुनीता पुढे म्हणाल्या, “हे असंच होतं. मला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. ही दारू पिते, पार्टी करते अरे दारू तुझ्या वडिलांच्या घरी करते? माझ्या घरी दारू पिते. माझ्या घरात मी एक बॉटेल पियेन किंवा १०”. सुनीता यांनी पुढे समाजातील लोकांच्या अपेक्षेप्रमाणे त्या कधीच वागणार नाही आणि आजवर त्यांनी कायम त्यांना आवडलं तेच केलं आहे, तसंच आयुष्य जगल्या आहेत असं सांगितलं आहे.
या रिअॅलिटी शोमुळे सुनीता आहुजा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. याआधीही त्यांनी शोमध्ये गोविंदाबरोबरच्या वैवाहिक आयुष्याबद्दल भाष्य केलं होतं. तसच, त्यांच्या नात्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अफवांवरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली होती. यावेळी सुनीता आहुजा यांनी ‘लॉक अप’मध्ये सहभागी होण्याच्या त्यांच्या निर्णयाबाबत गोविंदाला सुरुवातीला असलेली काळजी देखील व्यक्त केली. घरातील एखादी व्यक्ती आपल्या भावना दुखावेल, अशी भीती गोविंदा यांना वाटत होती, असा खुलासा त्यांनी केला. मात्र, आपण मानसिकदृष्ट्या खंबीर असून कोणत्याही परिस्थितीचा सामना स्वतः करू शकतो, असा विश्वासही सुनीता यांनी व्यक्त केला.
