Family Shows on OTT: सध्या तरी ओटीटीमुळे मनोरंजनाची कमतरता नाही. जगभरातील कोणत्याही भाषेतील चित्रपट, वेब सीरिज आणि टीव्ही शो तुम्ही तुमच्या फोनमध्ये घरबसल्या पाहू शकता. ओटीटीवर सर्व कलाकृती अश्लील किंवा फारच बोल्ड आहेत, असा एक समज झाला आहे, पण तसं नाही. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर कौटुंबिक शो आहेत जे तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर बसून पाहू शकता. अशाच काही वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात. गुल्लक मध्यमवर्गीय संतोष मिश्रा, त्यांची पत्नी आणि दोन मुलं यांच्या जीवनावर आधारित ही वेब सीरिज भारतातील सर्वसामान्य कुटुंबात घडणाऱ्या गोष्टी पडद्यावर दाखवते. ९ ते ५ या वेळेत नोकरी करून संतोष मिश्रा कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याची पत्नी गृहिणी आहे, जी दिवसभर घरातील कामात गुंतलेली असते. यातील दोघे भाऊ कधी आपापसात भांडतात तसेच एकमेकांवर प्रेमही खूप करतात. या सीरिजचे आतापर्यंत चार सीझन आले आहेत. ही तुम्ही सोनी लिव्हवर पाहू शकता. कृष्णा अभिषेकच्या वडिलांनी ‘या’ कारणाने कधीच सूनेला स्वीकारलं नाही; कश्मीरा म्हणाली, “मी हॉट, सेक्सी होते अन्…” पंचायत फुलेरा गाव, तेथील पंचायत आणि त्या गावात घडणाऱ्या गमतीशीर गोष्टी यावर आधारित ही वेब सीरिज खूपच मजेदार आहे. या सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन आले आहेत आणि ते सर्व सीझन प्रेक्षकांना फार आवडले. गावातील सचिव, प्रमुख आणि सहाय्यक सचिव यांच्यातील मैत्री यात अतिशय सुंदरपणे दाखवली आहे. ही वेब सीरिज तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता. पहिलं लग्न मोडल्यावर वयाने लहान कृष्णाच्या प्रेमात पडली होती कश्मीरा शाह, अभिनेत्री ५२ वर्षांची, तर पती फक्त… होम जर तुम्हाला 'पंचायत’ व ‘गुल्लक’ या सीरिज आवडल्या असतील तर होम ही सीरिजही आवडेल. या मजेशीर व्हिडीओमध्ये एका आनंदी कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ते राहत असलेलं घर खाली करण्याची नोटीस त्यांना येते आणि त्यानंतर ज्या गोष्टी घडतात त्यावर ही सीरिज बेतलेली आहे. मस्ती व हास्याने भरलेली ही सीरिज तुम्ही अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. महाराष्ट्राचा जावई आहे ‘हा’ लोकप्रिय अभिनेता, ऑन-स्क्रीन वहिनीच्या प्रेमात पडला अन् कुटुंबाचा विरोध पत्करून मंदिरात केलेलं लग्न चाचा विधायक हैं हमारे स्टँडअप कॉमेडियन झाकिर खानच्या 'चाचा विधायक हैं हमारे' या वेब सीरिजचे आतापर्यंत एकूण तीन सीझन आले आहेत. ही एक उत्तम कॉमेडी वेब सीरिज आहे, जी एक तरुण आणि त्याचे कुटुंब आणि मित्र यांच्याभोवती फिरते. या सीरिजचे तिन्ही सीझन प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहेत. १४ वर्षांचा संसार मोडला, १० वर्षांनी लहान व्यक्तीच्या प्रेमात आहे लोकप्रिय अभिनेत्री, पतीनेही केलंय दुसरं लग्न जामतारा ही वेब सीरिज अशा क्राइमवर आधारित आहे. आज काल डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे, त्याचबरोबर फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. या फसवणुकीत कोणाचेही बँक अकाउंट खाली होऊ शकते. खासकरून आपल्या आई-वडिलांनी बऱ्याच टेक्निकल गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे ही सीरिज त्यांच्याबरोबर तुम्ही पाहू शकता. ही सीरिज नेटफ्लिक्सवर आहे.