संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ या वेब सीरिजची चर्चा अजूनही कायम आहे. १ मेला प्रदर्शित झालेल्या या सीरिजला आज महिना पूर्ण झाला आहे, तरीही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. सीरिजच्या कथेपासून ते सीन्स, गाणी, कलाकारांचा अभिनय याविषयी चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर सीरिजच्या अनेक व्हिडीओंनी धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्री मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव, रिचा चड्ढा, संजीदा शेख, शर्मिन सेगल यांनी ‘हीरामंडी’मध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या सर्व अभिनेत्रींच्या कामाचं कौतुक होतं आहे. यापैकी एक म्हणजे संजीदा शेख. ‘हीरामंडी’मध्ये वहीदा पात्र साकारणाऱ्या संजीदाने नुकत्याच एका मुलाखतीमधून तिच्याबरोबर घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला.

‘हीरामंडी’ वेब सीरिजच्या यशानंतर अभिनेत्री संजीदा शेख अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकतीच तिने ‘हॉटरफ्लाय’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी तिने आपल्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आणि बरेच खुलासे देखील केले. याच मुलाखतीत संजीदाने तिच्याबरोबर घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला; जो एका नाईट क्लबमध्ये घडला होता.

हेही वाचा – Video: क्रूझ प्री-वेडिंगमधील अनंत-राधिकाचा पहिला व्हिडीओ आला समोर, गुलाबी रंगाच्या फ्रॉकमध्ये दिसली अंबानींची होणारी लाडकी सून

हेही वाचा – “आपल्याकडे गोंधळाचं वातावरण…”, लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आनंद इंगळेंचं भाष्य, म्हणाले, “भूमिका बदलणाऱ्यांना…”

संजीदा म्हणाली, “मला एक धक्कादायक प्रसंग आठवत आहे. पण तो कुठल्या मुलाकडून नाहीतर मुलीकडून झाला होता. मी एका नाईट क्लबमध्ये गेली होती. माझ्याबाजूने एक मुलगी जात होती. तिने माझ्या स्तनांना स्पर्श केला आणि ती तिथून निघून गेली. या घटनेमुळे मला धक्का बसला होता. मला कळतं नव्हतं माझ्याबरोबर नेमकं काय घडलंय. आपण नेहमी ऐकतो की, पुरुष मागे मारतात, गैरवर्तणुक करतात. पण यात मुली काही कमी नाहीत.”

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये जान्हवी कपूरने बॉयफ्रेंड शिखर पहारियाला भरवला घास, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, संजीदा शेखच्या वैयक्तिक आयुष्यात खूप चढ-उतार आले आहेत. २०१२ मध्ये संजीदाने अभिनेता आमिर अलीबरोबर लग्न केलं होतं. पण लग्नाच्या १० वर्षांनंतर २०२२मध्ये तिचा घटस्फोट झाला. दोघांना एक मुलगी असून तिचा सांभाळ अभिनेत्री करते. संजीदा व आमिर अलीने एकत्र छोट्या पडद्यावरील लोकप्रिय डान्स रिअ‍ॅलिटी शो ‘नच बलिए’ केला होता.