Bollywood Horror Movies on OTT: २०२४ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत अनेक हॉरर चित्रपट थिएटरमध्ये पाहायला मिळाले आहेत. आधी अजय देवगण आणि आर माधवनचा ‘शैतान’, नंतर शर्वरी वाघचा ‘मुंज्या’ आणि आता राजकुमार राव-श्रद्धा कपूर स्टारर ‘स्त्री २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत.

या चित्रपटांचे यश पाहिल्यानंतर लोकांना अजूनही हॉरर चित्रपटांचं वेड असल्याचं दिसून येतं. अशा परिस्थितीत जर तुम्हाला घरबसल्या हॉरर चित्रपट पहायचे असतील तर आम्ही तुम्हाला ओटीटीवर उपलब्ध अशा काही चित्रपटांची नावे सांगणार आहोत, जे तुम्ही एकटे बसून नक्कीच बघू शकणार नाही.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”
Bad News on OTT
१५ ऑगस्टला प्रदर्शित झालेला चित्रपट आला OTT वर, या वीकेंडला बॅड न्यूजसह ‘हे’ सिनेमे घरबसल्या पाहता येणार
Stree 2 on OTT
Stree 2 OTT Release: श्रद्धा कपूरचा ब्लॉकबस्टर ‘स्त्री २’ ओटीटीवर दाखल, कुठे पाहता येणार? जाणून घ्या
auro me kaha dum tha and ulajh ott release
एकाच दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित झाले चित्रपट, दोन्ही ठरले फ्लॉप; आता एकाच दिवशी ओटीटीवर येणार?
recent OTT release
या वीकेंडला OTT वर काय पाहायचं? वाचा चित्रपट अन् सीरिजची यादी!
aarya jadhao first post after Elimination
Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”

Call Me Bae to Sector 36: सप्टेंबर महिन्यात OTT वर येणार ‘हे’ चित्रपट अन् सीरिज; वाचा संपूर्ण यादी

परी (Pari)

२०१८ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रोसित रॉय यांनी केले होते. ‘परी’ या चित्रपटात अनुष्का शर्माचा भुताच्या रुपात दिसली होती. हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. हा हॉरर चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

आमिस (Aamis)

अर्घदीप बरुआ आणि लीमा दास या चित्रपट आमिस २०१९ मध्ये रिलीज झाला होता, हा एक हॉरर रोमँटिक चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन भास्कर हजारिका यांनी केलं आहे. एक विद्यार्थी विवाहित महिलेच्या प्रेमात कसा पडतो हे यात दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाचा क्लायमॅक्स खूपच भयंकर आहे. हा चित्रपट सोनी लिव्हवर पाहता येईल.

शैतान

अजय देवगण, आर माधवन व ज्योतिका आणि जानकी बोडीवाला यांचा शैतान चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

पिझ्झा (Pizza)

अक्षय अक्किनेनी दिग्दर्शित पिझ्झा हा एक भयपट आहे. याची कथा ही एक डिलिव्हरी बॉयवर आधारित आहे. हा चित्रपट एकटे बसून तुम्ही पाहू शकत नाही इतकी भीतीदायक आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.

सत्य घटनांवर आधारित ‘या’ १२ सुपरहिट भारतीय वेब सीरिज तुम्ही पाहिल्यात का? OTT वर आहेत उपलब्ध

बुलबुल (Bulbbul)

‘ॲनिमल’ चित्रपटातील तृप्ती डिमरी अन्विता दत्त दिग्दर्शित बुलबुल चित्रपटात दिसली होती. लोकांनाही हा चित्रपट खूप आवडला होता. या सिनेमात महिलांबरोबर होणारे गैरवर्तन दाखवण्यात आले होते. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

शापित (Shaapit)

विक्रम भट्ट दिग्दर्शित २०१० मध्ये रिलीज झालेल्या शापित चित्रपटात हॉरर रोमान्स पाहायला मिळाला होता. शुभ जोशी, राहुल देव यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात होता. डिस्ने प्लस हॉटस्टारवर उपलब्ध असलेला हा चित्रपट सर्वात भीतीदायक चित्रपटांपैकी एक आहे.

हेडफोनशिवाय बघू नका OTT वरील ‘हे’ चित्रपट, बोल्ड कंटेटचा आहे भडीमार

1920 लंडन (1920 London)

शर्मन जोशी आणि मीरा चोप्रा यांचा चित्रपट ‘1920 लंडन’ २०१६ मध्ये रिलीज झाला होता. सुरेश देसाई दिग्दर्शित हा चित्रपटही लोकांना आवडला होता. आता हा चित्रपट Zee5 आणि प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.