Horror Movies On OTT: कार्तिक आर्यनचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया ३’ तीन दिवसांपूर्वी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय, परिणामी सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शनही चांगलं झालंय. तुम्हालाही जर हॉरर सिनेमे म्हणजेच भयपट पाहायला खूप आवडत असतील तर ओटीटीवर उपलब्ध काही चित्रपट तुम्ही पाहायला हवे. खाली दिलेल्या यादीतील चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला भीती वाटल्याशिवाय राहणार नाही.

द कॉन्ज्युरिंग

The Conjuring on OTT : २०१३ मध्ये रिलीज झालेला ‘द कॉन्ज्युरिंग’ हा हॉरर मिस्ट्री चित्रपट लोकांना खूप आवडला होता. जेम्स वॅनने याचे दिग्दर्शन केले होते. कॉन्ज्युरिंग फ्रेंचाइजीचा हा पहिला चित्रपट होता, ज्यामध्ये वेरा फार्मिगा, पॅट्रिक विल्सन, रॉन लिव्हिंगस्टन आणि लिली टेलर मुख्य भूमिकेत होते. यानंतर चित्रपटाचे अनेक भाग आले. हा सिनेमा तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

Psychological Thriller Films On Hotstar
‘दृश्यम’ पाहिलाय? त्याहूनही भयंकर आहेत हॉटस्टारवरील ‘हे’ चित्रपट, पाहा हादरवून सोडणाऱ्या सिनेमांची यादी
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Best Movies On Prime Video
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरबसल्या पाहता येतील ‘हे’ चित्रपट; प्राइम व्हिडीओवरील उत्तम सिनेमांची यादी
suspense thriller movies on ott
OTT वर उपलब्ध आहेत ‘हे’ थरारक सस्पेन्स थ्रिलर सिनेमे, चित्रपटांच्या रहस्यमय कथा ठेवतील खिळवून; पाहा यादी
Underrated Thriller Movies on OTT
‘अंधाधुन’ पाहिलाय? त्यापेक्षाही जबरदस्त ट्विस्ट असलेले ‘हे’ चित्रपट आहेत OTT वर, वाचा यादी

हेही वाचा – ‘दृश्यम’ पाहिलाय? त्याहूनही भयंकर आहेत हॉटस्टारवरील ‘हे’ चित्रपट, पाहा हादरवून सोडणाऱ्या सिनेमांची यादी

इन्सिडियस

Insidious on OTT : ‘इन्सिडियस’ हा एक हॉरर मिस्ट्री चित्रपट आहे. या चित्रपटाचे बरेच भाग आतापर्यंत आले आहेत. ज्यांना हॉरर चित्रपट पाहायला आवडतात त्यांनी या फ्रेंचायजीचे जवळपास सगळेच चित्रपट पाहायला हवे. ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्ह व प्राइम व्हिडीओवर चाहत्यांना हा चित्रपट पाहता येईल.

अंडर द शॅडो

Under The Shadow on OTT: २०१६ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट ज्यांना भयपट पाहायला आवडतात, त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे. या चित्रपटाची कथा एका आई आणि मुलीभोवती फिरते. त्याचबरोबर या चित्रपटात दोन देशांमधील युद्ध पाहायला मिळते. या चित्रपटाला आयएमडीबीवर ६.८ रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

हेही वाचा – बाबा अन् भावाला गमावलं, प्रचंड संघर्षानंतर अभिनेत्रीने २८ व्या वर्षी मुंबईत घेतलं हक्काचं घर, आईसह पूजा करताना झाली भावुक

द वेलिंग

The Wailing on OTT: २०१६ मध्ये रिलीज झालेला ‘द वेलिंग’ हा एक कोरियन हॉरर सिनेमा आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओ आणि जिओ सिनेमावर पाहू शकता. या चित्रपटात एक अनोळखी व्यक्ती गावात आल्यानंतर एक रोग कसा पसरू लागतो हे पाहायला मिळतं. त्यानंतर एक पोलीस आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी हा आजार नेमका काय, याचे गूढ सोडवायला जातो, अशी चित्रपटाची कथा आहे.

हेही वाचा – दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरबसल्या पाहता येतील ‘हे’ चित्रपट; प्राइम व्हिडीओवरील उत्तम सिनेमांची यादी

द एविल डेड

The Evil Dead on OTT : चाहते प्राइम व्हिडिओवर हा हॉरर चित्रपट पाहू शकतात. हा चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला प्रचंड भीती वाटेल. या चित्रपटात काही मित्र जंगलात एका केबिनमध्ये कसे अडकतात आणि त्यानंतर त्यांचं काय होतं ते पाहायला मिळतं.

Story img Loader