Horror Movie On Ott : हॉरर सिनेमे आणि त्यातील थरारक आणि भयावह दृश्य यांचा मोठ्या प्रमाणावर चाहता वर्ग आहे. २१व्या शतकात हॉरर जॉनरमध्ये अनेक प्रयोग झाले आणि काही उत्तम चित्रपट तयार झाले, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर गडद छाप पाडली. सन २००० नंतर आलेल्या उत्तम हॉरर चित्रपटांची माहिती आम्ही आज तुम्हाला देणार आहोत. हे चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःच्या सावलीला पाहिलं तरी तुम्हाला भीती वाटेल. हे सिनेमे तुम्हाला विविध ओटीटी माध्यमावर पाहता येतील.

द कॉन्ज्युरिंग

The Conjuring On OTT : २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात एका कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. या कुटुंबातील लोक एका नवीन घरात राहायला जातात. तिथे त्यांच्या मुलीवर अज्ञात शक्तीचा प्रभाव पडतो. पॅरानॉर्मल ॲक्टिविटीवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणतो. हा चित्रपट नेटफ्लिक्स आणि ‘प्राईम व्हिडीओ’वर उपलब्ध आहे.

4th November 2024 Rashi Bhavishya
४ नोव्हेंबर पंचांग : पूर्वाषाढा नक्षत्रात वृषभ,कर्कसह ‘या’ ३ राशींचा आनंदित जाईल दिवस; कामात यश ते गोड बातमी मिळणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
Singham Again Box Office Collection Day 5
‘सिंघम अगेन’ चित्रपटाने अवघ्या ५ दिवसांत कमावले तब्बल ‘इतके’ कोटी, या मल्टिस्टारर सिनेमाचं एकूण बजेट किती? जाणून घ्या…
29th October 2024 Horoscope Today
Daily Horoscope, 29 October : धनत्रयोदशीला मेष, सिंहसह ‘या’ राशींवर होणार धन-सुखाचा वर्षाव, तुमच्यावर असणार का लक्ष्मीची कृपा? वाचा राशिभविष्य
best suspense thriller webseries on netflix
सस्पेन्स अन् ॲक्शन कलाकृती पाहायला आवडतात? वाचा नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजची यादी
PV Sindhu's Would-Be-Husband Who Has Worked With IPL Team, Who Is Venkata Datta Sai
PV Sindhu Marriage : पी.व्ही. सिंधू लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत; जाणून घ्या कोणाशी आणि कधी करणार लग्न?

हेही वाचा…सस्पेन्स अन् ॲक्शन कलाकृती पाहायला आवडतात? वाचा नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजची यादी

सिनिस्टर सीरिज

Sinister On Ott : २०१२ मध्ये आलेली ‘सिनिस्टर’ ही अमेरिकन सुपरनॅचरल हॉरर फ्रेंचाईज आहे. एका कुटुंबावर दुष्ट आत्म्यांचा प्रभाव असल्याची ही कथा आहे. हा सिनेमा ‘प्राईम व्हिडीओ’वर उपलब्ध आहे.

इनसिडियस

Insidious On Ott : २०१० मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट एका कुटुंबाची कथा सांगतो. हे कुटुंब नवीन घरात राहायला गेल्यानंतर भयंकर अडचणीत सापडते. दुष्ट आत्म्याविरोधातील कुटुंबाची लढाई या सिनेमात दाखवण्यात आली आहे. हा सिनेमा ‘प्राईम व्हिडीओ’वर उपलब्ध आहे.

हेही वाचा…८ वर्षांचं भांडण मिटलं! अखेर गोविंदा व भाचा कृष्णा अभिषेक दिसणार एकत्र; कॉमेडियन म्हणाला, “आता मी तुम्हाला…”

द डेसेंट

The Descent On Ott : २००५ साली आलेल्या या ब्रिटीश चित्रपटात सहा महिला एका गुहेत अडकतात. त्यांना फ्लेश-इटिंग प्राण्यांपासून स्वतःचा जीव वाचवायचा असतो, अशा आशयाची या चित्रपटाची कथा आहे. हा सिनेमा ‘प्राईम व्हिडीओ’वर उपलब्ध आहे.

द रिंग

The Ring On Ott : २००२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘द रिंग’ या चित्रपटात एक गूढ कथा आहे. एक व्हिडीओ पाहिल्यानंतर चार किशोरवयीन मुलांचा रहस्यमय मृत्यू होतो. त्यानंतर सुरू झालेल्या तपासात अनेक धक्कादायक रहस्य उघडकीस येतात. हा सिनेमा ‘प्राईम व्हिडीओ’ आणि ‘जिओ सिनेमा’वर उपलब्ध आहे.

हेही वाचा…गूढ कथा अन् खिळवून ठेवणारे थरारक सीन्स; OTT वरील ‘हे’ सिनेमे पाहिलेत का? यातील एक चित्रपट आहे सत्य घटनेवर आधारित

इट

IT On Ott : २०१७ मध्ये आलेल्या ‘इट’ चित्रपटात रूप बदलणाऱ्या एका सैतानाची कथा आहे, तो दर २७ वर्षांनी परततो. या सैतानाला पराभूत करण्यासाठी शहरातील लोक एकत्र येऊन कसे लढतात, अशा आशयाची याची कथा आहे. हा सिनेमा ‘अ‍ॅपल टीव्ही’ आणि ‘गूगल प्ले मुव्हीज’वर उपलब्ध आहे.

हेही वाचा…इरफान खानच्या निधनाचं दु:ख आजही कायम, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितले अभिनेत्याचे शेवटचे क्षण; म्हणाला, “तो मानसिकरित्या…”

जीपर्स क्रीपर्स

Jeepers Creepers : २००१ मध्ये आलेल्या या चित्रपटात दोन भावंडांची कथा आहे, ते दोघे एका जुन्या चर्चच्या बेसमेंटमधील रहस्यमय गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न करतात. यातील रहस्य आणि अनेक सीन्स प्रेक्षकांचा थरकाप उडवतात. हा सिनेमा ‘प्राईम व्हिडीओ’वर पाहता येईल.