ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रत्येक जॉनरमधील चित्रपट आणि वेब सीरिज पाहायला मिळतात. यामध्ये क्राइम आणि सस्पेन्स थ्रिलर या धाटणीच्या कलाकृतींचा मोठा चाहतावर्ग आहे. गुन्हेगारीवर आधारित कथांमध्ये बँकेतून पैसे चोरण्याचा प्रकार हा देखील चित्रपट निर्मात्यांच्या आवडीचा विषय राहिला आहे.
याचा अंदाज तुम्हाला नुकताच ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या एका नव्या चित्रपटावरून सहज लावता येईल. बँक रॉबरीवर आधारित हा चित्रपट नेटफ्लिक्सची लोकप्रिय सीरिज ‘मनी हाइस्ट’लाही टक्कर देतो. कोणता आहे हा चित्रपट, त्यात कोणते कलाकार आहेत आणि कुठे पाहता येईल याबद्दल जाणून घेऊया.
ओटीटीवर ट्रेंड होतेय चित्रपट, काय आहे विषय
आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, तो थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर नुकताच जिओ हॉटस्टारवर आला आहे. २ तास ४६ मिनिटांच्या या चित्रपटात एका बँक कर्मचाऱ्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे. त्याच्या डोळ्यांदेखत काही दरोडेखोर त्याच्याच बँकेत दरोडा टाकतात. यानंतर तो बँक कर्मचारी या दरोडेखोरांकडून बदला घेतो आणि बँकेचे सर्व पैसे परत मिळवतो. या संपूर्ण प्रवासात चित्रपटाच्या कथेत अनेक रंजक वळणं आणि थरार पाहायला मिळतो. या मल्याळम चित्रपटाचं नाव आहे ‘आय नोबडी’ (I Nobody) आहे.
पृथ्वीराज सुकुमारन अभिनीत या चित्रपटाने आपल्या दमदार कथानकाच्या जोरावर मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता ‘आय नोबडी’ला ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवरही चांगला प्रतीसाद मिळत आहे. ओटीटीवर प्रदर्शित होताच हा चित्रपट ‘मस्ट वॉच’ ठरला आहे. तुम्हालाही दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील चित्रपट पाहायला आवडत असतील, तर हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल.
पृथ्वीराज सुकुमारनच्या ‘आय नोबडी’ या चित्रपटाची लोकप्रियता त्याच्या IMDb रेटिंगवरून सहज लक्षात येते. IMDbने या मल्याळम चित्रपटाला १० पैकी ६.२ रेटिंग दिलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर थरार, रहस्य आणि विचार करायला भाग पाडणारे चित्रपट व सीरिज पाहायला आवडत असतील हा चित्रपट एक चांगला पर्याय ठरू शकतो.
पृथ्वीराज सुकुमारनने आतापर्यंत वेगवेगळ्या धाटणीच्या अनेक चित्रपटात काम केलं आहे. त्याच्या अभिनयाचंही अनेकदा कौतुक झालं आहे. त्यामुळे तो या चित्रपटात असल्यानेही चित्रपटाला सिनेमागृहात चांगला प्रतिसाद मिळाला. आता अखेर थिएटरनंतर चित्रपट ओटीटीवर आल्याने ज्यांनी थिएटरमध्ये पाहिला नाही ते घरबसल्या पाहू शकतात.
