तमाम वाद झाल्यानंतर समय रैना पुन्हा एकदा त्याच्या ‘इंडियाज गॉट लेटंट’ शोचा दुसरा सीजन घेऊन प्रेक्षकांसमोर आला. दुसऱ्या सिझनच्या पहिल्या भागात अभिनेत्री आलिया भट आणि शर्वरी या प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. या शोची चर्चा होते आहे ती मराठी अभिनेता सुकृत देव या मराठमोळ्या अभिनेत्यामुळे. अंबरनाथ या ठिकाणी सुकृत देव राहतो. सुकृत या मराठी मुलाने. ‘इंडियाज गॉट लेटंट’चा हा शो या मराठी अभिनेत्याने अक्षरशः गाजवला. पहिल्यापासून शेवटपर्यंत त्याचा अभिनय इतका कमाल होता, की खुद्द समय रैनाही निःशब्द झाला. सगळ्यांनी भरभरून कौतुक केल्यानंतर हा अभिनेता भावनिक झाला होता. सध्या त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आलिया भट्ट, शर्वरी वाघ, समय रैना सगळ्यांनीच त्याला उभं राहून अभिवादन केलं.

अंबरनाथचा मराठी मुलगा सोशल मीडियावर चर्चेत

समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटंट’ दुसऱ्या सिझनच्या पहिल्या भागात सुकृत देव या मराठी अभिनेत्याच्या अभिनयामुळे सगळेच चाट पडले. या तरुणाला सगळ्यांनी १० पैकी १० मार्क दिले. सुरुवातीपासून शेवटपर्यंत दारुड्या माणसाची भूमिका त्याने इतकी उत्तम वठवली होती की सगळ्यांना वाटलं तो खरंच दारु पिऊन आला आहे. आलिया भट्ट आणि समय रैना यांनी जेव्हा ‘कट’ म्हटलं तेव्हा सुकृतने त्याच्या भूमिकेतून बाहेर आला. ज्यानंर सगळ्यांनी एकच जल्लोष केला. सुकृतने शोमध्ये अनेकांना रोस्ट केलं. दारुड्या माणसाची भूमिका त्याने उत्तम वठवली. त्याने खरा आवाज काढून दाखवला तेव्हा आलिया भट्ट, शर्वरी, समय रैना व संपूर्ण पॅनलसह उपस्थितही उठून उभे राहिले. त्याला प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात प्रेक्षकांनी दाद दिली. हे सगळं पाहिल्यानंतर, हा अभिनेता प्रचंड भावनिक झाला होता. त्याचे हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Alia Bhatt, Sharvari Wagh and Samay Impressed By marathi Actor Sukrut Dev
समयचा अभिनय पाहून सगळेच सुखावले. (फोटो-सोशल मीडिया)

आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ काय म्हणाल्या?

तू खूप उत्तम काम केलं आहे. तू व्हायरल होणार आहेस. मला कमाल याची वाटते आहे की तू भूमिकेतून अजून बाहेर आला नाहीस. खूप छान, असं आलिया भट्ट म्हणाली, तर शर्वरी वाघ म्हणाली मला तुझ्याकडून प्रेरणा मिळाली आहे.मी आता तुला पाहून माझ्या कामात आणखी मेहनतीने काम करेन.

सुकृत जिंकू शकला नाही

सुकृत देवला समय रैना, आलिया भट्ट, शर्वरी वाघ आणि सगळ्यांनीच त्याला १० पैकी १० मार्क्स दिले. मात्र तो या स्पर्धेत जिंकू शकला नाही. कारण त्याने स्वतःला ८ मार्क्स दिले. तुम्ही जे सादर करणार असता त्यासाठी तुम्ही तुमचे मार्क्स द्यायचे असतात. जजेसच्या मार्कांशी ते मार्क्स जुळले तरच तुम्ही जिंकता. त्यामुळे सुकृत स्पर्धा जिंकला नाही पण त्याने मनं जिंकली.

Alia bhatt emotional marathi Stage actor Sukrut Dev
समय रैनाच्या शोवर आलेल्या सुकृत देवची सोशल मीडियावर चर्चा (फोटो-सोशल मीडिया)

… आणि सुकृत भूमिकेतून बाहेर आला

सुकृत देवला समय आणि आलिया दोघंही कट म्हणाले आणि त्यानंतर सुकृतने भूमिकेतून बाहेर येत हाय धिस इज सुकृत देव इतकंच म्हटलं. ज्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळ्यांनीच त्याचं खूप कौतुक केलं. शर्वरी त्याच्या जवळ येऊन त्याला म्हणाली की तू खूप छान काम केलंस. ज्यानंतर सुकृतच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. सुकृतला आलिया भट्ट म्हणाली तू का रडतोस मित्रा? त्यावर सुकृतने उत्तर दिलं.

सुकृत देव काय म्हणाला?

एवढीच इच्छा होती की मी एक दिवस खूप मोठ्या गर्दीसमोर परफॉर्म करेन आणि सगळ्यांना माझा अभिनय आवडेल. तुम्ही सगळ्यांनी माझं कौतुक केलं त्यामुळे मला भावनिक व्हायला झालं आहे असं म्हणत तो रडू लागला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. मग समयने त्याला जवळ घेतलं आणि हसवलंही. समय म्हणाला की तुला आज आम्ही एक फोन गिफ्ट करतो, असं म्हणत त्याला समयने फोन भेट दिला आणि आलिया, शर्वरी सगळ्यांनी त्याच्यासह सेल्फी घेतला. ज्याचीही चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर सुकृत देव हा मराठी मुलगा यामुळे चर्चेत आला आहे.