This Show Beats Dhurandhar Ott Viewership : कोविडनंतर लोकांमध्ये ओटीटीची खूप क्रेझ निर्माण झाली. लोक आता टीव्ही सीरियलसुद्धा ओटीटीवरच पाहतात. कारण- त्यावर कुठलाच ब्रेक येत नाही आणि वेळेचेही काही निर्बंध नसतात. अशातच गेला आठवडा म्हणजेच ९ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी हे दिवस ओटीटीसाठी खास ठरले. गेल्या आठवड्यात ओटीटीवर पाहण्यासाठी खूप काही होतं.

टी -२० वर्ल्ड कप, ‘धुरंधर’, ‘नागिन ७’ आणि इतर काही कलाकृती होत्या. ओटीटीवर कार्यक्रमांची मेजवानी असताना लोकांनी या आठवड्यात सगळ्यात जास्त काय पाहिलं जाणून घेऊयात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ५ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ची सर्वत्र क्रेझ असताना ओटीटीवर हा चित्रपट सर्वाधिक पाहिला गेलेला नाही. ‘धुरंधर’ला कोणत्या शोने टक्कर दिली याबद्दल जाणून घेऊयात…

‘धुरंधर’ला कोणी मागे टाकलं?

ओटीटीवर कितीही आणि काहीही पाहण्यासाठी उपलब्ध असलं तरी जेव्हा भारत-पाकिस्तानची मॅच असते तेव्हा सर्वाधिक लोक तोच सामना पाहण्यास पसंती देतात. अशातच Ormax Mediaनुसार आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्ड कपमध्ये १६ फेब्रुवारी रोजी झालेला भारत-पाकिस्तानमधील सामना सर्वाधिक लोकांनी पाहिला. १४५.० मिलियन व्ह्यूज या सामन्याला होते. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की, त्यानंतर ओटीटीवर या आठवड्यात सर्वाधिक पाहिलेला गेलेला शो कोणता आहे? आदित्य धर दिग्दर्शत व लिखित ‘धुरंधर’ चित्रपटाला कोणी टक्कर देत मागे टाकलं? जाणून घेऊयात….

ओटीटीवर दुसऱ्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या शोचं नाव आहे ‘द ५०’. या शोला ५.८ मिलियन व्ह्युज मिळाले. ‘कलर्स टीव्ही’ आणि ‘जिओ हॉटस्टार’वर हा शो प्रसारित होत आहे. हिंदी टेलिव्हिजनवरील हा एक लोकप्रिय रिअॅलिटी शो. विविध क्षेत्रांतील जवळपास ५० लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतलाय. १ फेब्रुवारीला सुरू झालेला हा शो सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. त्यानंतर या आठवड्यात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटाचं नाव आहे ‘धुरंधर’.

रणवीर सिंह, अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. तेव्हापासून आतापर्यंत प्रदर्शित झाल्याच्या दोन महिन्यांनंतरही प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहत होते. तर ओटीटीवरही हा चित्रपट पाहण्यासाठी उपलब्ध आहे. जर तुम्ही अजूनही ‘धुरंधर’ पाहिला नसेल, तर तो तुम्ही नेटफ्लिक्सवरही पाहू शकता.