Indian Bollywood films trending on Pakistani Netflix: ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे जगभरातील सिनेमा एका क्लिकवर उपलब्ध होत असताना, पाकिस्तानात सध्या भारतीय चित्रपटांची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. नेटफ्लिक्सच्या टॉप १० ट्रेंडिंग यादीत भारताच्या तब्बल तीन चित्रपटांनी आपले वर्चस्व निर्माण केले आहे. १२ जून २०२६ रोजी प्रदर्शित झालेला आणि १९४७ च्या भारत-पाकिस्तान फाळणीवर आधारित चित्रपट सलग दोन आठवड्यांपासून पाकिस्तानात पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. पाकिस्तानमध्ये ‘नेटफ्लिक्सवरील टॉप १० ट्रेंडिंग लिस्ट’मध्ये कोणते भारतीय चित्रपट आहेत, ते जाणून घेऊयात.
१. ‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटाचा दबदबा
पाकिस्तानमधील नेटफ्लिक्सच्या टॉप १० ट्रेंडिंग यादीत ‘मैं वापस आऊंगा’ हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट यावर्षी १२ जून २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. या रोमँटिक-ड्रामा चित्रपटात वेदांग रैना, दिलजीत दोसांझ आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत आहेत. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटाची कथा १९४७ च्या भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेदनेवर आधारित आहे. हा चित्रपट सलग दोन आठवड्यांपासून पाकिस्तानमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
२. ‘कॉकटेल २’ देखील ट्रेंडिंग लिस्टमध्ये
१९ जून रोजी प्रदर्शित झालेल्या ‘कॉकटेल २’ चित्रपटाला भारतात प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता हा चित्रपट पाकिस्तानमध्येही खूप चर्चेत आहे. पाकिस्तानी प्रेक्षकांनाही हा चित्रपट आवडला आहे. त्यांच्या नेटफ्लिक्सच्या टॉप १० ट्रेंडिंग यादीत हा सिनेमा सामील झाला आहे. शाहीद कपूर, क्रिती सेनॉन आणि रश्मिका मंदाना या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. रोमान्स आणि कॉमेडीने भरपूर असलेल्या या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती.
३. सनी देओलच्या ‘इक्का’चा पाकिस्तानमध्ये जलवा
सनी देओलचा ‘इक्का’ हा चित्रपट गेल्या ६ आठवड्यांपासून पाकिस्तानमध्ये नेटफ्लिक्सच्या टॉप १० ट्रेंडिंग यादीत आहे. हा चित्रपट यावर्षी थेट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिले. या चित्रपटात अक्षय खन्ना देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
पाकिस्तानमधील नेटफ्लिक्सवरील ‘टॉप १० ट्रेंडिंग’ची यादी
१. मैं वापस आऊंगा
२. द लास्ट हाऊस (The Last House)
३. कॉकटेल २
४. ड्रॉप (Drop)
५. एक्सटिंक्शन (Extinction)
६. स्पायडर-मॅन: फार फ्रॉम होम
७. द कॉल (The Call)
८. इक्का
९. स्पायडर-मॅन: होमकमिंग
१०. ७२ आवर्स (72 Hours)
