Jab Khuli Kitaab OTT Release ZEE5: थिएटरबरोबरच दर आठवड्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवनवीन वेब सीरिज व चित्रपट रिलीज होत असतात. गेल्या आठवड्याच्या शेवटी ओटीटी प्लॅटफॉर्म झी५ वर एक नवीन चित्रपट रिलीज झाला. ३ दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला हा चित्रपट ओटीटीवर ट्रेंडिंग आहे.
९४ मिनिटांचा हा चित्रपट प्रौढ प्रेमकहाणीवर बेतलेला आहे. एका धक्कादायक गुपितामुळे विखुरलेल्या कुटुंबाची ही भावनिक कथा महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटाची भन्नाट व वेगळी कथा नक्कीच तुमचं मन जिंकेल. कारण ओटीटीवर रिलीज होताच तो पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
अनेकदा ज्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चर्चा नसते, ते ओटीटीवर मात्र इतिहास घडवतात. असाच एक कौटुंबिक ड्रामा असलेला ‘जब खुली किताब’ हा चित्रपट सध्या ‘झी५’ (ZEE5) या प्लॅटफॉर्मवर नंबर १ वर ट्रेंड करत आहे. दिग्गज अभिनेते पंकज कपूर आणि डिंपल कपाडिया यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट एका ७४ वर्षांच्या वृद्ध जोडप्याभोवती फिरतो. कोमातून बाहेर आल्यानंतर पत्नीने सांगितलेल्या ५० वर्षांपूर्वीच्या एका गुपितामुळे पती थेट कोर्टाची पायरी चढतो. ‘सलाम-ए-इश्क’ फेम डिंपल कपाडिया आणि कसलेले अभिनेते पंकज कपूर यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक या चित्रपटाकडे वळत असून, सोशल मीडियावर या आगळ्यावेगळ्या प्रेमकथेची जोरदार चर्चा रंगली आहे.
जब खुली किताब सिनेमाची कथा
सिनेमात दाखवलंय की ७४ वर्षांचे गोपाल (पंकज कपूर) कोमात असलेल्या आपल्या पत्नीची अनुसूयाची (डिंपल कपाडिया) खूप सेवा करत असतात. दोन वर्षांनंतर अनुसूया अचानक कोमातून बाहेर येते. त्यामुळे कुटुंबीय आनंदी होतात. शुद्धीवर आल्यानंतर अनुसूया गोपालला ५० वर्षांपूर्वीचे एक गुपित सांगते. ते ऐकून गोपाळ इतके हादरतात की ५० वर्षांच्या संसारानंतर आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. त्यांच्या या निर्णयाने कुटुंबात मोठा गोंधळ उडतो. घटस्फोटाचे हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचते, तिथेही यांची भांडणं, कुरबुरी सुरू असतात.
आता त्यांचा घटस्फोट होतो की या वयात त्यांचे प्रेम पुन्हा बहरते, हे पाहण्यासाठी तुम्हाला ‘जब खुली किताब’ (Jab Khuli Kitaab) हा चित्रपट पाहावा लागेल. या चित्रपटात दिग्गज कलाकार पंकज कपूर आणि डिंपल कपाडिया यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तसेच अपारशक्ती खुराना, मानसी पारेख आणि समीर सोनी हे कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.
‘जब खुली किताब’ ओटीटीवर ठरला नंबर-१
‘जब खुली किताब’ला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. याच कारणामुळे हा चित्रपट सध्या ‘झी५’वर पहिल्या क्रमांकावर आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने ही आगळीवेगळी प्रेमकथा पाहत आहेत.
