२०२२ मध्ये जेम्स कॅमेरून दिग्दर्शित ‘अवतार – द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाने जगभरात जबरदस्त कमाई केली. १६ डिसेंबर २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, आणि भारतातही प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. काही गोष्टींमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यातही अडकला होता, पण तरी बॉक्स ऑफिसवर ‘अवतार २’ने रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली. आता या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस उलटून गेले असूनही तो ओटीटीवर प्रदर्शित झालेला नसल्याने बरेच लोक संभ्रमात आहेत. लवकरच ‘अवतार – द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. युट्यूब आणि आयट्यून्स या प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट उपलब्ध आहेच, शिवाय आता प्राइम व्हिडिओ या प्लॅटफॉर्मवरही ‘अवतार २’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा : प्रियांका चोप्रानंतर बॉलिवूडमधील कंपूशाही आणि राजकारणाबद्दल गायक अमाल मलिकने सोडलं मौन; म्हणाला…

हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर थेट सगळ्यांसाठी उपलब्ध नसून यासाठी खास रक्कम मोजावी लागणार असल्याचंही म्हंटलं जात आहे. प्राइम व्हिडिओच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर याबद्दल माहिती देण्यात आली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी एक वेगळी रक्कम भरल्यावरच तुम्हाला हा चित्रपट पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मीडिया रीपोर्टनुसार प्राइम व्हिडिओवर हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला २० डॉलर्स म्हणजेच १६०० रुपये यासाठी वेगळे द्यावे लागणार आहेत. २००९ साली आलेल्या ‘अवतार’नंतरच याच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. ‘अवतार’चे आणखीन ३ भाग येणार असल्याचीसुद्धा चर्चा आहे. तिसरा भाग ‘अवतार : द सिड बेअरेर’ हा २०२४ मध्ये प्रदर्शित होणार अशी चर्चा आहे तर पुढचे २ भाग २०२६ आणि २०२८ या वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: James cameron directed avatar the way of water ott platform release date declared avn
First published on: 29-03-2023 at 11:25 IST