ओटीटीवर या वीकेंडला काय पाहावं, असा विचार तुम्ही करत असाल तर आज आम्ही तुम्हाला २०२५ मधील एका हिट चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. ऐतिहासिक प्रसंगावर आधारित या चित्रपटाचं प्रेक्षक व समीक्षकांनी खूप कौतुक केलं होतं. त्याचबरोबर ओटीटीवरही तो कोट्यवधी लोकांनी पाहिला होता.
या चित्रपटाचं नाव आहे ‘केसरी २’. अक्षय कुमार, आर. माधवन व अनन्या पांडे यांचा २०२५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘केसरी: चॅप्टर २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भारतात अंदाजे ८९ कोटी आणि जगभरात १३८ कोटींची कमाई केली. तसेच तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पाहिला गेला होता. आयएमडीबीवरही त्याला उत्तम रेटिंग मिळाले होते. जर तुम्ही अद्याप हा चित्रपट पाहिला नसेल, तर तुम्ही तो जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.
जिओ हॉटस्टारवर सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट
रिपोर्ट्सनुसार, ‘केसरी चॅप्टर 2’ ला जियो हॉटस्टारवर १८.१ मिलियन म्हणजेच जवळपास १.८ कोटींहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. केसरी २ हा २०२५ चा सर्वाधिक पाहिला गेलेला नॉन नेटफ्लिक्स चित्रपट ठरला आहे.
‘केसरी चॅप्टर 2‘ हा चित्रपट २०१९ मध्ये आलेल्या ‘केसरी’चा सिक्वेल आहे. या चित्रपटाची कथा पूर्णपणे वेगळी व नवीन आहे. हा चित्रपट १९१९ सालच्या जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित आहे.
या चित्रपटात अक्षय कुमारने प्रसिद्ध वकील सी. शंकरन नायर यांची भूमिका साकारली आहे. त्यांनी ब्रिटिश सरकारला न्यायालयात आव्हान दिलं होतं. सिनेमात आर. माधवन ब्रिटिश वकील नेव्हिल मॅककिन्लीच्या भूमिकेत आहे. तो अक्षयच्या विरोधात असतो. तर अनन्या पांडे एका कायद्याच्या विद्यार्थिनीची भूमिका साकारत आहे जी चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावते. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण सिंह त्यागीने केले आहे.
केसरी २ चे आयएमडीबी रेटिंग
आयएमडीबीवर, केसरी २ चित्रपटाला १० पैकी ८.२ रेटिंग मिळाले आहे. समीक्षकांनीही या चित्रपटाचे कौतुक केलं होतं. मागील काही वर्षांपासून अक्षय कुमारचे चित्रपट सतत फ्लॉप होत होते. पण केसरी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. ज्यामुळे हा अक्षय कुमारच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

