The Diplomat OTT Release: बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता जॉन अब्राहमचा २०२५मधील पहिला चित्रपट प्रेक्षकांचा चांगलाच पसंतीस पडला. या चित्रपटाचं नाव आहे ‘द डिप्लोमॅट’. १४ मार्चला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चार आठवड्यांमध्ये ३६.९६ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर आता जॉनचा ‘द डिप्लोमॅट’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘द डिप्लोमॅट’ चित्रपट ओटीटीवर कधी आणि कुठे पाहता येणार आहे? जाणून घ्या…

आजकाल नवा चित्रपट ओटीटीवर कधी प्रदर्शित होतोय, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. काही महिन्यांपूर्वी आलेले चित्रपट घरबसल्या पाहता येतात. आता या यादीत पुढचं नाव आहे ‘द डिप्लोमॅट’ ( The Diplomat ) चित्रपट. लवकरच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणारा ‘द डिप्लोमॅट’ ( The Diplomat ) ओटीटीवर प्रदर्शित होतं आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम व्यतिरिक्त सादिया खतीबसारखे अनेक कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर आधारित उज्मा अहमदच्या पाकिस्तानातून भारतात परतण्याची कहाणी दाखवण्यात आली आहे.

‘द डिप्लोमॅट’ ( The Diplomat ) चित्रपट उद्या, ९ मेला नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. शिवम नायर दिग्दर्शित हा चित्रपट उद्या दुपारी १.३० वाजल्यापासून घरबसल्या पाहता येणार आहे. पण, अद्याप नेटफ्लिक्स इंडियाकडून याबाबत अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही.

‘द डिप्लोमॅट’ ( The Diplomat ) चित्रपटाचं कलेक्शन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॉन अब्राहमच्या ‘द डिप्लोमॅट’चे ( The Diplomat ) बजेट सुमारे २० कोटी रुपये होते. ‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ४० कोटींची कमाई केली आहे. ‘द डिप्लोमॅट’ सुपरहिट ठरला असून या चित्रपटाने बजेटपेक्षा दुप्पट कमाई केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाचे नाव जॉन अब्राहमच्या यशस्वी देशभक्तीवर आधारित असलेले चित्रपट ‘सत्यमेव जयते’, ‘परमाणु’, ‘फोर्स’ आणि ‘रॉ’च्या यादीत सामिल झालं आहे.