June OTT Release : नवीन महिना, आठवडा सुरू झाला की मनोरंजन प्रेमींना आता काय नवीन पाहायला मिळणार, कोणत्या कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शित होत आहेत. विशेष करुन ओटीटीवर काय नवीन पाहता येइल या विचारात ते असतात. जून महिना नुकताच सुरू झाला असून या महिन्यातही मनोरंजनाचा धमाका होणार आहे. हॉलीवूड, बॉलीवूड, दाक्षिणात्य अशा अनेक कलाकृती ओटीटीमार्फत प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.

जून महिन्यात ओटीटीवर अॅक्शन, थ्रिलर,रोमँटिक अशा विविध जॉनरच्या कलाकृती घरबसल्या पाहता येणार आहेत. यामध्ये ‘राजा शिवाजी’, ‘भूत बंगला’, ‘मां बहन’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. या नवीन कलाकृती कधी व कुठे रिलीज होणार आहेत आणि त्यांचे विषय काय आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

Law and Order – ही एक अमेरिकन पोलिस प्रोसीजल क्राईम ड्रामा सीरिज असून. डिक वुल्फ याचे मेकर आहेत. ही सीरिज १ जूनपासून नेटफ्लिस्कवर प्रदर्शित झाली आहे.

हस्तिनापूर के वीर – ही एक मायथोलॉजीकल सीरिज आहे. ज्यामध्ये महाभारतातील पाच पांडवांची कथा दाखवण्यात आली आहे. २ जूनपासून सोनी लिव्हवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

मेड इन इंडियाद टाइटन स्टोरी : ही एक बॉयोग्राफिकल ड्रामा सीरिज आहे. नसीरुद्दीन शाह आणि जिम सरभ, वैभव तत्ववादी यामध्ये प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. ३ जूनला ही सीरिज प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे.

मां बहन माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका असलेली हा चित्रपट ४ जूनपासून नेटफ्लिस्कवर रिलीज होत आहे. माधुरीचा यामधून वेगळा लूक आणि भूमिका पाहायला मिळणार आहे. तसंच यामधून तृप्ती व माधुरी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

द वॉचर्स – २०२४मध्ये प्रदर्शित झालेला हा एक हॉरर मेस्ट्री चित्रपट हॉरर जॉनर आवडणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. Ishy nightsने या चित्रपटाचं लिखान आणि दिग्दर्शन केलं आहे. ४ जूनला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

गुल्लक सीझन ५ – ही एक फॅमिली ड्रामा सीरिज असून ५ जूनला सोनी लिव्हवर प्रदर्शित होत आहे. या सीझनमध्ये अशा कुटुंबाची गोष्ट पाहायला मिळणार आहे जेत्यांच्या दैनदिन गरजा भागवण्यासाठी खूप मेहनत करत असतात.

Teach You A Lesson – ही एक अॅक्शन के-ड्राम सीरिज आहे. या सीरिजमध्ये शाळांमध्ये वाढणारा बेशिस्तपणा आणि रॅगिंगसारखे प्रकार रोखण्यासाठी सरकारी टीम कठोर निर्णय घेते असं पाहायला मिळतं. ५ जूनला नेटफ्लिक्सवर ही सीरिज रिलीज होत आहे.

धुरंधर द रिवेंज – (रॉ और अनदेखा) – आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंह अभिनीत या चित्रपटाचा रॉ और अनदेखा वर्जन लवकरच रिलीज होणार आहे. ५ जूनपासून जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे.

केडी – द डेव्हिल – हा एक कन्नड अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये ध्रुव सरजा आणि संजय दत्त प्रमुख भूमिकांमध्ये झळकत आहेत. ३० २०२६ रोजी चित्रपटगृहात रिलीज झालेला हा चित्रपट ५ जूनपासून झी ५वर रिलीज होत आहे.

ऑफिस रोमान्स – Ol Parker दिग्दर्शित हा एक रोमँटिक, कॉमेडी चित्रपट आहे. जेनिफर लोपेज आणि ब्रेट गोल्डस्टीन मुख्य भूमिकांमध्ये आहेत. चित्रपटात एका कंपनीची CEO तिच्या नवीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडते असं चित्र पाहायला मिळतं. ५ जूनपासून नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहायला मिळत आहे.

ब्राउन – ही एक क्राइम-थ्रिलर सीरिज आहे. बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूर यामध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. ५ जून पासून झी ५वर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

भूत बंगला – प्रियदर्शन दिग्दर्शित आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेला हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. थिएटरमध्ये याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. १२ जूनपासून नेटफ्लिक्सवर हा चित्रपट आता रिलीज होत आहे.

राजा शिवाजी – रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत हा चित्रपट १ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांचा या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अशातच आता २६ जूनला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.