scorecardresearch

‘कांटा लगा’फेम अभिनेत्री साकारणार सेक्स वर्करची भूमिका; म्हणाली, “ती वस्ती घाण आहे असा…”

त्या वस्तीत जाऊन त्या स्त्रियांबरोबर राहून शेफालीने या भूमिकेची तयारी केली

‘कांटा लगा’फेम अभिनेत्री साकारणार सेक्स वर्करची भूमिका; म्हणाली, “ती वस्ती घाण आहे असा…”
शेफाली जरीवाला

‘कांटा लगा’ या म्युझिक अल्बममधून एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झालेली अभिनेत्री शेफाली जरीवाला ही सध्या पुन्हा चर्चेत आहे. ती तिच्या सोशल मिडिया अकाऊंटच्या माध्यमातून चर्चेत असतेच. आता मात्र एमएक्स प्लेअरवरील ‘रात्री की यात्री’ या वेबसीरिजच्या निमित्ताने ती पुन्हा चर्चेत आली आहे. या वेबसीरिजमध्ये देहविक्री करणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या सीरिजचा पुढचा सीझन प्रेक्षकाच्या भेटीला आला आहे.

या नव्या सीझनमध्ये शेफाली ही या सेक्स वर्करची भूमिका निभावणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यासाठी तिने बरीच मेहनत घेतली आहे. त्या वस्तीत जाऊन त्या स्त्रीयांबरोबर राहून शेफालीने या भूमिकेची तयारी केली आहे. याविषयी तिने नुकताचा एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. शिवाय आपल्या यूया समाजातील गडद वास्तव पाहून तिला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या असंही शेफालीने स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा : ‘महाभारत’मध्ये दुर्योधनाची भूमिका साकारणाऱ्या पुनीत इस्सर यांना १३ लाखांचा गंडा; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार शेफालीने या मुलाखतीमध्ये त्या भूमिकेबद्दल खुलासा केला आहे. शेफाली म्हणाली, “या वेबसीरिजमध्ये काम करण्याआधी माझ्या मनात या सेक्स वर्करबाबत पूर्वग्रह होता. मी कायम त्यांच्याकडे वेगळ्याच नजरेने बघायचे. त्यांचं काम वाईट आहे, ती वस्ती घाण आहे असे विचार माझ्या मनात यायचे, पण हे खूप चुकीचं आहे. आपल्या समाजाने यांना वाळीत टाकल्यासारखी वागणूक दिली आहे, पण बघायला गेलं त्यासुद्धा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य स्त्रीयाच आहेत. त्यांच्या समस्या आणि या व्यवसायाकडे वळण्यामागील त्यांची कारणं समजून घेण्यात आपण समाज म्हणून कुठेतरी कमी पडलो आहोत.”

पुढे शेफाली म्हणाली, “या भूमिकेसाठी जेव्हा मी त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांची गोष्ट जाणून घेतली तेव्हा माझ्या या विचारांमध्ये आमूलाग्र बदल झाला. ही संपूर्ण प्रक्रियाच माझ्यासाठी फार कठीण होती, आणि यातून मी बरंच काही शिकले.” याबरोबरच अशाच काही उत्तम आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी मी उत्सुक आहे असंही शेफालीने नमूद केलं आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 12:29 IST

संबंधित बातम्या