Kanguva OTT Release: तमिळ सुपरस्टार सूर्या व बॉबी देओल यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘कंगुवा’ काही दिवसांपूर्वी १४ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती, त्यामुळे तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. लोकांमध्ये या सिनेमाची वेगळीच क्रेझ होती आणि अनेक प्रेक्षकांनी सूर्याच्या अभिनयाचे कौतुकही केले. मात्र त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

सुरुवातीचे २-३ दिवस चांगले कलेक्शन केल्यावर चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. आता अनेक लोक हा चित्रपट ओटीटीवर येण्याची वाट पाहत आहेत. हा चित्रपट कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे, ते जाणून घेऊयात.

lakhat ek amcha dada fame nitish chavan dance with Mahesh Jadhav and swapnil kinase
Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा काजू, पुड्याबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रचार थांबला; आता चेंडू मतदारांच्या कोर्टात, २० नोव्हेंबरची प्रतिक्षा
Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?

सुपरहिट चित्रपट दिले अन् मुंबई सोडून ‘इथे’ निघून गेला आमिर खानचा भाऊ; आता करतोय ‘हे’ काम, म्हणाला…

कधी व कुठे रिलीज होईल ‘कंगुवा’?

आठवडाभरापूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यात अपयशी ठरला. ‘कंगुवा’ चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी आणि व्हीएफएक्सची सगळीकडे चर्चा आहे. मात्र, तरीही चित्रपटाचं कलेक्शन कमी राहिलं. ‘कंगुवा’ने भारतात पहिल्या दिवशी २२ कोटी रुपये कमावले. तब्बल ३५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये ‘कंगुवा’ची निर्मिती करण्यात आली आहे. त्या तुलनेत पहिल्या दिवसाची कमाई खूप कमी होती.

Pushpa 2 : यंदा समांथा नव्हे तर श्रीलीलाने गाजवलं ‘पुष्पा २’चं आयटम साँग! ‘Kissik’ गाण्याची पहिली झलक आली समोर

काही लोकांनी चित्रपटातील कलाकार, कथा आणि व्हीएफएक्सचे कौतुक केले. अनेकांना बॉबी दओल खलनायक म्हणून पुन्हा एकदा भावला. आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. ‘कंगुवा’चे ओटीटी राइट्स प्राइम व्हिडीओने विकत घेतले आहेत. हा चित्रपट लोकांना प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.

प्राइम व्हिडीओने हा चित्रपट तब्बल १०० कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर दीड ते दोन महिन्यांनी ओटीटीवर येईल. या वर्षाच्या सुरुवातीला, प्राइम व्हिडीओने एक पोस्ट शेअर केली होती. त्यानुसार, चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर काही दिवसांनी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित केला जाईल.

हेही वाचा : ५ वर्षांनी मालिका संपली, सेट तुटला…; ‘आई कुठे काय करते’ फेम अनिरुद्धची भावुक पोस्ट; सेटवरची ‘ही’ गोष्ट आणली स्वत:च्या घरी

‘कंगुवा’ने किती कमाई केली?

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, १४ नोव्हेंबरला रिलीज झालेल्या या सिनेमाने आतापर्यंत फक्त ६५ कोटींचा व्यवसाय केला आहे. सुरुवातीला चांगली कमाई करणाऱ्या या सिनेमाचे कलेक्शन आता अवघ्या काही लाखांवर आले आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये बनवण्यात आला आहे. मात्र चित्रपटाला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे हा चित्रपट यंदाच्या बिग बजेट फ्लॉप चित्रपटांपैकी एक ठरला आहे.