Kareena Kapoor Crime Thriller Movies on OTT: मागच्या शुक्रवारी १३ सप्टेंबरला करीना कपूर खानचा ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं समीक्षक कौतुक करत आहेत. हंसल मेहता दिग्दर्शित हा चित्रपट एक थ्रिलर मिस्ट्री आहे. या चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये फारस चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. कमाईच्या बाबतीत चित्रपटाने अजून १० कोटींचा टप्पा पार केलेला नाही.
तुम्ही करीना कपूरचे चाहते असाल तर तिचे अनेक क्राइम- थ्रिलर चित्रपट ओटीटीवर पाहू शकता. करीनाने नुकतीच इंडस्ट्रीत २५ वर्षे पूर्ण केली आहेत. या काळात तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही सिनेमात तिचा रोमँटिक अवतार पाहायला मिळाला, तर काहींमध्ये ती ॲक्शन करताना दिसली. ओटीटीवर उपलब्ध असलेल्या तिच्या क्राईम थ्रिलर चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात.
पुन्हा प्रदर्शित झाल्यावर ‘तुंबाड’ची जबरदस्त कमाई, ६ वर्षांपूर्वीच्या मूळ कलेक्शनला टाकलं मागे
जाने जान
२०२३ मध्ये रिलीज झालेल्या ‘जाने जान’ या चित्रपटात करीना कपूरसह जयदीप अहलावत आणि विजय वर्मा यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटात करीनाने साकारलेले पात्र प्रेक्षकांना फार आवडले होते. हा चित्रपट फक्त ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला होता. तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहू शकता.
ऐतराज
२००४ मध्ये प्रदर्शित झालेला अब्बास-मस्तान दिग्दर्शित ‘ऐतराज’ चित्रपट प्रेक्षकांना आवडला होता. करीना कपूर, प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमार यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट एक रोमँटिक थ्रिलर आहे. आपल्या पतीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी पत्नी काय करते ते या चित्रपटात पाहायला मिळालं होतं. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म झी 5 वर पाहता येईल.
३६ चायना टाउन
२००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘३६ चायना टाउन’मध्ये शाहीद कपूर, करीना कपूरसह इतर काही कलाकार होते. हा त्यावेळी गाजलेल्या चित्रपटांपैकी एक होता. चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. या थ्रिलर कॉमेडी चित्रपटाचा सस्पेन्स जबरदस्त होता. तुम्हाला जर तुम्ही करीनाचे चाहते असाल आणि क्राईम थ्रिलर चित्रपट पाहायला आवडत असतील तर तुम्ही हा चित्रपट झी 5 वर पाहू शकता.
अजनबी
२००१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘अजनबी’ हा चित्रपट अब्बास मस्ताननेच दिग्दर्शित केला होता. या सिनेमात करीनासह अक्षय कुमार, बॉबी देओल होते. या चित्रपटात दोन शेजाऱ्यांची कथा दाखवण्यात आली होती. यात अक्षयची पत्नी बिपाशाचा खून होतो आणि त्याचा आरोप बॉबीवर होतो. बिपाशाच्या पात्राचा खून नेमकं कोण करतं ते शेवटपर्यंत कळत नाही. या चित्रपटाचा शेवट खूपच उत्तम होता. हा सिनेमा तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.