Samay Raina स्टँड अप कॉमेडियन समय रैनाने आता अखेर १४ महिन्यांनी कमबॅक केलं आहे. इंडियाज गॉट लेटेंट वरुन जो वाद झाला होता, त्यानंतर समय रैना सोशल मीडियावर नव्हता. आता समय रैना स्टिल अलाइव्ह नावाने एक व्हिडीओ त्याने युट्यूबवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्याने मुकेश खन्ना, सुनील पाल यांच्यासह अमिताभ बच्चन यांचीही खिल्ली उडवली आहे. दरम्यान या कार्यक्रमात केलेलं एक विधान पुन्हा एकदा वादग्रस्त ठरण्याची चिन्हं आहेत. एवढंच नाही तर इंडियाज गॉट लेटेंटचा नवा सिझन आम्ही लवकरच घेऊन येऊ असंही समय रैनाने सांगितलं आहे.
काय म्हणाला समय रैना?
जे काही घडून गेलं ते मी पाहिलं आहे. काही लोक किती मेहनत करत होते की माझ्या विरोधात एफआयआर दाखल केली जाईल. जे काही घडलं त्यामुळे माझं मानसिक आरोग्यही बिघडलं होतं. आता माझ्या विरोधात तीन एफआयआर आहेत. मला ठाऊक होतं की एक दिवस असा येईल की माझ्याविरोधात FIR होईल. पण तो FIR मी काहीतरी बोललो म्हणून होईल असं वाटलं होतं. ज्या एपिसोडमुळे सगळा वाद झाला त्यात मी शांत बसलो होतो. काही बोललो नव्हतो. पण आपण काश्मिरी लोक क्रॉस फायरमध्येच मारले जातो.
“एक FIR के लिये कुशल कितनी मेहनत कर रहा है..मै देख रहा था. मेरा मेंटल हेल्थ भी खराब हो गया था. मेरे खिलाफ तीन FIR है. मुझे पता था मेरे एक दिन मेरे खिलाफ FIR होगा लेकिन वो मेरे कुछ बोलने पर होगा ऐसे लगा था. मै उस एपिसोडमें कुछ भी नहीं बोला था. चुपचाप बैठा था. हम कश्मिरी क्रॉस फायरमेंही मरते हैं. ”
एका जोकसाठी किती मोठी शिक्षा मिळाली? तुम्हाला कल्पना आहे?
Samay Raina Still Alive या स्पेशल शोमध्ये त्याने हे विधान केलं आहे. आमच्यावर टीका करायला सगळेच आले होते. राजकारणी, पोलीस, सुनील पाल. सुनील पाल म्हणत होता कपिल शर्माकडून काहीतरी शिका. आम्ही कपिल शर्माकडून शिकायचं? आमच्या पुढच्या एपिसोडमध्ये कपिल शर्मा येणार होता. कपिल शर्मा मला मेसेज करत होता की तू खूप चांगला शो करतोस. तुझं टायमिंग चांगलं आहे. लव्ह यूअर शो. आता अशात आम्हाला सुनील पालने आम्हाला सल्ले दिले. त्यावेळी अनेकांनी आमच्यावर टीका केली. शक्तिमानने (मुकेश खन्ना) आमच्यावर टीका केली. शक्तिमानसे कौन लडेगा, सॉरी शक्तिमान असं म्हणत समयने मुकेश खन्नाचीही खिल्ली उडवली. तो शक्तिमान म्हणत होता की यांच्या कंटेटचा मुलांवर काय परिणाम होईल. तुमच्यापैकी किती लोक शक्तिमान बघायचे मला माहीत नाही. त्या काळात दर महिना-पंधरा दिवसाला बातमी यायची एखादा मुलगा शक्तिमानची कॉपी करताना इमारतीवरुन खाली पडला. ज्या माणसाने मुलांना मारलंय तो आम्हाला काय सांगतोय?

मी अर्धवट झोपेत होतो तेव्हा…
पुढे समय रैना म्हणाला, बरं हे सगळं कशासाठी तर आमचा जोक आवडला नाही म्हणून. एका छोट्या जोकसाठी इतका विरोध? सगळ्यांकडून चुका होतात. मी एकदा अबॉर्शनवर जोक केला होता. सकाळी ७ वाजता ती पोस्ट केली. मुली नाराज झाल्या. मी तेव्हा अर्धवट झोपेत होतो. काहींना मी शिव्याही घातल्या. मी त्यासाठी माफी मागतली होती. पण मी जेव्हा काही मुलींना शिव्या दिल्या त्यानंतर १० हजार मुलींनी त्या पाहिल्या त्यांना त्या पटल्या नाहीत त्यांनी मला बहिष्कृत केलं. ही असते शिक्षा. पण आम्ही जोक केल्यावर काय झालं? माझ्या घरी लष्कर आलं. एवढं कोण करतं? असं समय रैना म्हणाला.
