Watch This Psychological Thrillers on Netflix : ओटीटीवर सध्या एकापेक्षा एक असे चित्रपट व सीरिज प्रदर्शित होत आहेत. हल्ली काही चित्रपट तर थिएटरमध्ये प्रदर्शित न होता थेट ओटीटीवर प्रदर्शित होतात. यापैकीच एक म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला लोकप्रिय अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा हिचा सुन्न करणार ‘अक्युज्ड’ हा सिनेमा.
ओटीटीवर प्रदर्शित होताच या चित्रपटाने अनेकांचं लक्ष वेधलं. ॲक्शन थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांचं लक्ष वेधतात. परंतु, यावेळी सायकोलॉजीकल-थ्रिलर चित्रपटाने अनेकांची पसंती मिळवल्याचं दिसतं. कोंकणा सेन शर्मा हिच्या ‘अक्युज्ड’ या चित्रपटाने ‘तेरे इश्क मे’ आणि ‘धुरंधर’यांसारख्या लोकप्रिय आणि हिट ठरलेल्या चित्रपटांनाही मागे सोडत नेटफ्लिक्सवरील नंबर वन ट्रेडिंग फिल्म बनली आहे.
अनुभूती कश्यपने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात दोन महिलांची गोष्ट पाहायला मिळते. कोंकणा सेन शर्मा हिने यामध्ये गीतिका हे पात्र साकारलं आहे, तर नवोदित अभिनेत्री प्रतिभा रांटा हिने मीरा हे पात्र साकारलं आहे. मीरा व गितीका दोघी लेसबियन असून त्यांचं लग्न झालेलं असतं आणि त्या सुखी वैवाहिक जीवन जगत असतात. गीतिका एक यशस्वी डॉक्टर असते, तिचं करिअर सुरळीत सुरू असतं.
कथेत येतो ट्विस्ट
गितीका व मीरा एक दिवस मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतात. परंतु, ज्या दिवशी त्या हा निर्णय घेतात तेव्हा गितीकाच्या आयुष्यात मोठं संकट येतं. तिच्यावर सेक्सुअल हरेसमेंटचा आरोप केला जातो आणि त्यानंतर ज्या हॉस्पिटलमध्ये तिला स्टार डॉक्टर म्हणून ओळखलं जातं तिथे तिची नोकरी जाण्याची शक्यता वाढते. कथानकात पुढे न्यायव्यवस्था आणि सामाजिक गोष्टींमध्ये अडकल्यानंतर मीराचं आई होण्याचं स्वप्न हळूहळू संपत जातं.
चित्रपटाची सर्वात मोठी ताकद म्हणजे चित्रपटाची कास्ट. कोंकणा सेन शर्माने खूप समजूतदारपणे तिचं पात्र साकारलं असून प्रतिभानेसुद्धा तिची भूमिका चोख वठवली आहे. ‘लापता लेडीज’नंतर या चित्रपटातून तिने पुन्हा प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. चित्रपटात नाती आणि समाजातील पारंपरिक विचार यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. परंतु, चित्रपटातील क्लायमॅक्स इतकंही आश्चर्यचकित करणारं नसून डार्क थ्रिलर कलाकृतीकडून अपेक्षित असतं तसं नाहीये.
अनुभूती कश्यप दिग्दर्शित हा चित्रपट २७ फेब्रुवारी रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंगवर आहे. यामधून प्रतिभा व कोंकणा पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. शिवाय चित्रपटाची सीरिजही वेगळी आणि समाजिक मुद्द्यांशी निगडीत असल्याने याची चर्चा होत आहे.
