बॉलीवूडमध्ये अनेक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट तयार झाले आहेत, ज्यांना प्रेक्षकांनी भरभरून पसंती दर्शवली आहे. पण तुम्ही आता बॉलीवूडचे सस्पेन्स थ्रिलर सिनेमे पाहून कंटाळला असाल आणि जर तुम्ही देखील डिजिटल प्लॅटफॉर्मवर काही नवीन कंटेंट शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला ४ कोरियन सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे हिंदीमध्ये डब्ड आहेत. हे चित्रपट पाहिल्यावर कदाचित तुम्ही बॉलीवूडचे चित्रपट विसरून जाल.

कॉन्फिडेन्शियल असाइनमेंट

Confidential Assignment On Ott :या यादीतील पहिला चित्रपट म्हणजे २०१७ साली आलेला ‘कॉन्फिडेन्शियल असाइनमेंट’. या चित्रपटाची कथा एका गुप्तहेराच्या आयुष्याभोवती फिरते. यात उत्तर कोरियाचा एक गुन्हेगारी संघटक दक्षिण कोरियात घुसखोरी करतो. त्यामुळे दक्षिण कोरियाच्या गुप्तहेराला उत्तर कोरियाच्या गुप्तहेराच्या मदतीने या संघटनेच्या ठिकाणांचा शोध घ्यावा लागतो. हा चित्रपट ‘जिओ सिनेमा’ आणि ‘प्राइम व्हिडीओ’वर पाहता येईल.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा…‘मर्डर २’ पाहिलाय? त्याहूनही भयानक आहेत जिओ सिनेमावरील ‘हे’ सायकॉलिजल थ्रिलर चित्रपट; पाहा यादी

ट्रेन टू बुसान

Train To Busan On Ott : २०१६ साली प्रदर्शित झालेला हा एक अ‍ॅक्शन-हॉरर चित्रपट आहे. यात एका बाप-लेकीची गोष्ट आहे, जे बुसानला जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करत असतात. मात्र, त्यांचा हा प्रवास एक वाईट स्वप्न बनतो. कारण त्याच दरम्यान दक्षिण कोरियात झॉम्बी व्हायरस पसरतो आणि ते त्यात अडकतात. हा चित्रपट ‘जिओ सिनेमा’ वर हिंदीमध्ये उपलब्ध आहे.

द स्पाय अंडरकव्हर ऑपरेशन

The Spy Undercover Operation On Ott : २०१३ साली आलेला हा कोरियन अ‍ॅक्शन चित्रपट बॉलीवूडच्या अनेक स्पाय चित्रपटांना तोडीस तोड ठरतो. चित्रपटाच्या नावावरूनच हे लक्षात येते की कथा एका गुप्तहेराभोवती फिरते. हा चित्रपट हिंदीमध्ये ‘यूट्यूब’ आणि ‘प्राइम व्हिडीओ’वर पाहता येतो.

हेही वाचा…नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आहे? रविवारी पाहा ‘या’ जबरदस्त सस्पेन्स-थ्रिलर वेब सीरिज, वाचा यादी

अ हार्ड डे

A Hard Day On Ott :२०१४ साली आलेला हा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. यात एका व्यक्तीकडून अपघात होतो. अपघात झाल्यावर तो पळून जातो. हिट-अँड-रन झाल्यावरही तो व्यक्ती गुप्तहेर असल्याने शिताफीने अपघात कोणी केला हे समोर येऊ देत नाही. परंतु लवकरच अपघाताचा साक्षीदार असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीकडून त्याला एक रहस्यमय कॉल येतो. असे कथानक असलेला हा सिनेमा प्रेक्षक हा चित्रपट ‘प्राइम व्हिडीओ’वर पाहू शकतात.

Story img Loader