वीकेंड जवळ आला की ओटीटीवर नेमकं काय पाहायचं, याची चर्चा चित्रपटप्रेमींमध्ये पाहायला मिळते. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट, वेब सीरिज रिलीज होत असतात. काही चित्रपट रिलीज होताच ओटीटीवर ट्रेंड करू लागतात. तुम्ही या आठवड्यात काहीतरी मजेदार पाहायचा विचार करत असाल आज आम्ही तुम्हाला सांगतोय तो चित्रपट नक्की पाहा.
एक म्युझिकल ड्रामा चित्रपट ओटीटीवर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाला ओटीटीवर टॉप रेटिंग मिळाले आहे. खरं तर हा चित्रपट १३ वर्षांपूर्वी आलेल्या सिनेमाचा सिक्वेल आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे. कारण तो ओटीटीवर ट्रेंड करतोय. हा चित्रपट १५ नोव्हेंबर २०२५ रोजी थिएटर्समध्ये रिलीज झाला होता. नंतर तो ओटीटीवर आला.
प्राइम व्हिडीओ हा लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. प्राइम व्हिडीओवर नुकतेच एका म्युझिकल ड्रामा चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर ट्रेंडिंग आहे. या चित्रपटाचं नाव काय, ते जाणून घेऊयात.
चित्रपटाचं नाव काय?
‘कुमकी २’ असं या चित्रपटाचं नाव आहे. प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाल्यानंतर, ‘कुमकी २’ ने लवकरच टॉप ट्रेंडिंग लिस्टमध्ये स्थान मिळवलं. हा २०१२ मध्ये आलेल्या ‘कुमकी’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. चित्रपटाच्या कथेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या भागाप्रमाणेच ‘कुमकी २’ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळत आहे. या सिनेमात अर्जुन दास आणि श्रीता राव मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा जंगल प्रेम आणि त्याच्याशी संबंधित कनेक्शन व रहस्ये दाखवण्यात आली आहेत.
‘कुमकी २’ हा चित्रपट १९८० च्या दशकाच्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे. दक्षिण भारतातील एक तरुण भूमी आणि रेस्क्यू केलेलं हत्तीचं पिल्लू निला यांच्या भावनिक बंधाची गोष्ट आहे.
‘कुमकी २’ बद्दल बोलायचं झाल्यास, अमेझॉन प्राइम व्हिडीओवरील टॉप १० च्या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे. आयएमडीबीवर, या चित्रपटाला १० पैकी ६.४ रेटिंग मिळाले आहे. जर तुम्ही अद्याप हा चित्रपट पाहिला नसेल, तर तुम्ही या वीकेंडला ओटीटीवर नक्कीच तो पाहू शकता. हा चित्रपट पाहताना तुम्हाला कंटाळा येणार नाही. विशेषतः त्याच्या कथेत एक महत्त्वाचा ट्विस्ट आहे जो तुम्हाला तो शेवटपर्यंत खिळवून ठेवले. या चित्रपटाचा रनिंग टाइम २ तास १३ मिनिटांचा आहे.
