अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा सध्या ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्या आहेत. शोच्या सुरुवातीच्या काही भागांमध्ये त्यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत आणि पतीच्या विवाहबाह्य संबंधांबाबत केलेल्या स्पष्ट वक्तव्यांमुळे त्या चर्चेत आल्या.

अशातच आता अभिनेत्री शिल्पा शिंदे वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून या शोमध्ये आली आहे. शोमध्ये प्रवेश करताच तिने अनेक स्पर्धकांशी वाद घालण्यास सुरुवात केला. यामध्ये सुनीता आहुजा यांच्यासोबतचाही तिचा वाद रंगला. ‘लॉक अप’च्या नव्या प्रोमोमध्ये शिल्पा शिंदेने सुनीता आहुजा यांना गोविंदाबद्दल केलेल्या वक्तव्यांवरून जाब विचारला.

शिल्पा शिंदे व सुनीता आहुजा यांच्यामध्ये झाला वाद

शिल्पाने गोविंदाचं कौतुक करत म्हटलं, “गोविंदांचे लाखो चाहते आहेत. मग तुम्ही त्यांच्याबद्दल अशा प्रकारची वक्तव्ये कशी करू शकता? तुम्ही असं कसं बोलू शकता? आणि हे बोलण्याचा निर्णय खरंच तुमचाच होता का?” यावर सुनीता आहुजा संतापल्या आणि म्हणाल्या, “जेव्हा तुझ्यावर अशी वेळ येईल, तेव्हा तुला समजेल. त्यामुळे जास्त बोलू नकोस.” दोघींमध्ये झालेल्या या वादावर सोशल मीडियावरही नेटकरी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

गेल्या महिन्यात शिल्पा शिंदे चर्चेत आली होती. तिने ‘भाबीजी घर पर हैं’चे निर्माते संजय कोहली यांच्यावर केलेले लैंगिक छळाचे आरोप खोटे होते, अशी कबुली दिली होती. त्या वेळी स्वतःला चारही बाजूंनी घेरल्यासारखं वाटत असल्यामुळे आपण असा आरोप केल्याचंही तिने सांगितलं होतं. त्यावेळी तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

दरम्यान, ‘लॉक अप’च्या चौथ्या भागात सुनीता आहुजा यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, “त्या त्यांच्या मुलांसाठी जगतात आणि पतीचे विवाहबाह्य संबंध जरी असले, तरी आता त्या काहीही बदलू शकत नाहीत. गेल्या काही वर्षांत गोविंदाचे एका तरुण मराठी अभिनेत्रीशी संबंध असल्याच्या अफवांनीही जोर धरला होता. सुनीता यांनीही वेळोवेळी केलेल्या काही वक्तव्यांतून त्या व गोविंदा अनेकांच्या चर्चेचा विषय बनले होते.

‘लॉक अप सीझन २’ला नुकतीच सुरुवात झाली आहे. या पर्वात सुनीता आहुजा, राम कपूर, शिवांगी जोशी, आकांक्षा चौधरी, हर्षद चोपडा, योगेश रावत, रियाझ अली, धीरज धूपर, श्रेया कार्ला, आकांक्षा चमोला आणि सूफी मोतीवाला यांसारखे स्पर्धक सहभागी झाले आहेत.