एक चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. अवघ्या २४ तासांत या चित्रपटाने ओटीटीवर इतका धुमाकूळ घातला की ओटीटीवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंडिंग असलेल्या ‘वॉर मशीन’ (War Machine) या चित्रपटालाही मागे टाकलं.

हा चित्रपट कॉमेडी आणि ड्रामाचा मिलाफ आहे. जर तुम्ही या वीकेंडला एखादा उत्तम किंवा टॉप रेटेड कॉमेडी चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर या नवीन चित्रपटाचा तुमच्या वॉचलिस्टमध्ये नक्की समावेश करा. हा चित्रपट तुम्हाला हसवण्याबरोबरच भावूकही करेल. या चित्रपटाचं नाव आहे मेड इन कोरिया.

मेड इन कोरिया (Made In Korea) सिनेमाची कथा

चित्रपटाची हिरोईन (प्रियंका अरुल मोहन) लहानपणापासूनच कोरियन संस्कृती, तिथली गाणी आणि ड्रामा (K-Drama) यांच्या प्रेमात असते. दक्षिण कोरियाला जाणं आणि तिथे राहणं हे तिचं स्वप्न असतं. अनेक प्रयत्नांनंतर अखेर तिला कोरियाला जाण्याची संधी मिळते. ती आनंदाने तिथे पोहोचते, मात्र तिने स्वप्नात पाहिलेले कोरिया आणि प्रत्यक्ष अनुभवातले कोरिया यात मोठी तफावत असते. कोरियात गेल्यानंतर तिला अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. यामध्ये प्रेमात झालेली फसवणूक, पैशांची कमतरता आणि भाषेचा व संस्कृतीचा मोठा अडथळा यांचा समावेश असतो. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी तिला तिथे मोठा संघर्ष करावा लागतो.

प्रेमात झालेली फसवणूक असो, पैशांसाठी करावी लागणारी वणवण असो किंवा सांस्कृतिक मतभेद… एका मुलीचे स्वप्न एका क्षणात कडू सत्यात बदलते. १ तास ५२ मिनिटांचा हा चित्रपट १२ मार्च रोजी थेट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Made In Korea Trailer

चित्रपटाला मिळाले सकारात्मक रिव्ह्यू

आम्ही ज्या ‘मेड इन कोरिया’ (Made In Korea) चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे दिग्दर्शन रा. कार्तिक यांनी केले आहे. या चित्रपटात प्रियंका अरुल मोहन, पार्क हे-जिन, सी-हुन बेक, ऋषिकांत, हा-रम जो आणि जे-ह्योन जँग यांच्या मुख्य भूमिका आहेत. समीक्षकांनी या चित्रपटाला सकारात्मक रिव्ह्यू दिले आहेत.

‘मेड इन कोरिया’ कुठे पाहायचा?

‘मेड इन कोरिया’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. सध्या हा चित्रपट टॉप १० ट्रेंडिंग लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. याने ‘विथ लव्ह’ आणि ‘वॉर मशीन’ सारख्या चित्रपटांना मागं टाकले आहे. तुम्ही हा चित्रपट तमिळ, हिंदी, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये पाहू शकता. या वीकेंडला तुमचा काही प्लॅन नसेल आणि घरातच सिनेमा बघत चिल करायचा विचार तुम्ही केला असेल, तर मेड इन कोरिया पाहून तुम्ही वेळ घालवू शकता.