Maa Behn Netflix Movie Trending Update in Marathi: ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होत असतात. दरम्यान, ४ जून रोजी रिलीज झालेल्या ‘मां-बहन’ (Maa Behn) या चित्रपटाने ओटीटीवर रिलीज होताच बॉक्स ऑफिस आणि स्ट्रीमिंगचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर धरना दुर्गा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने साऊथ सुपरस्टार धनुषच्या ‘कारा’ चित्रपटाला दुसऱ्या क्रमांकावर ढकलून नेटफ्लिक्स टॉप १० मध्ये पहिला नंबर पटकावला आहे. हा एक कॉमेडी-थ्रिलर चित्रपट असून यात अभिनेता रवी किशन यांच्या मृतदेहाभोवती फिरणारी एक रहस्यमयी आणि मनोरंजक कथा दाखवण्यात आली आहे.

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला अनेक चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होत असतात. जगभरातील निर्मात्यांबरोबरच भारतीय चित्रपट निर्मात्यांचेही अनेक चित्रपट व सीरिज नेटफ्लिक्सवर येत असतात. नुकताच साऊथ सुपरस्टार धनुषचा ‘कारा’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घालत होता, तर सैफ अली खानच्या ‘कर्तव्य’ चित्रपटानेही टॉप १० मध्ये जागा मिळवली होती. दरम्यान, आता एका नव्या चित्रपटाने रिलीज होताच पहिला नंबर पटकावला आहे. आम्ही ज्या सिनेमाबद्दल बोलतोय त्यात माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत आहे.

आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे ‘मां-बहन’. यात आईची भूमिका माधुरी दीक्षितने साकारली आहे, तर तिच्या मुलींच्या भूमिकेत तृप्ती डिमरी व झरना दुर्गा आहेत. मा बहन चित्रपट ४ जून रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. रिलीज होताच हा चित्रपट थेट पहिल्या नंबरवर पोहोचला आहे. यामुळे साऊथ स्टार धनुषचा ‘कारा’ हा चित्रपट आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘कारा’ ३० एप्रिल रोजी सिनेमागृहात रिलीज झाल्यानंतर, २८ मे रोजी नेटफ्लिक्सवर आला होता आणि लवकरच तो पहिल्या क्रमांकावर होता. सध्या ‘Meg 2: The Trench’ तिसऱ्या क्रमांकावर आणि ‘Godzilla x Kong: The New Empire’ चौथ्या क्रमांकावर आहे, तर सैफ अली खानचा ‘कर्तव्य’ हा चित्रपट सहाव्या क्रमांकावर आहे.

मां बहन चित्रपटाचा ट्रेलर

‘मां-बहन’ या चित्रपटात माधुरी दीक्षितने दोन मुलींच्या आईची भूमिका साकारली आहे. या कॉमेडी-थ्रिलर चित्रपटात माधुरीच्या पात्राचे नाव ‘रेखा’ असे आहे. तर तिच्या जया आणि सुषमा या दोन मुलींची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री तृप्ति डिमरी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर धरना दुर्गा यांनी केली आहे. याशिवाय चित्रपटात रवी किशन देखील महत्त्वाच्या भूमिकेत असून ते माधुरीच्या शेजाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचा एकूण रनटाईम १२७ मिनिटं म्हणजेच दोन तास ७ मिनिटांचा आहे.

‘मां-बहन’ चित्रपटाची कथा काय आहे?

‘मां-बहन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी यांनी केले आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच माधुरी आणि तिच्या दोन्ही मुली काही ना काही गडबड करत असतात. पण एकदा त्यांचा शेजारी (रवी किशन) मृतदेह त्यांच्याच घरात आढळतो. त्यानंतर पुढे काय घडतं, हे जाणून घेण्यासाठी नेटफ्लिक्सवर हा चित्रपट नक्की पाहा.