जगभरात शुक्रवारी अनेक चित्रपट थिएटर्स व ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर रिलीज केले जातात. त्यानंतर शनिवार व रविवारी वीकेंड असतो. त्यामुळे बरेच जण शुक्रवारी रिलीज झालेले सिनेमे व वेब सीरिज पाहतात. ओटीटीवर सिनेमे शुक्रवारीच प्रदर्शित होतील, असं नाही इतर दिवशीही होतात. या आठवड्यातही ओटीटीवर अनेक चित्रपट व वेब सीरिज रिलीज झाल्या आहेत. काही बहुप्रतिक्षित सीरिजचे सीझन रिलीज झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला या वीकेंडला ओटीटीवर काय नवीन पाहता येईल ते जाणून घेऊयात.

कोटा फॅक्टरी ३

कोटा फॅक्टरीचा तिसरा सीझन २० जून रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. तरुणांमध्ये या सीरिजची प्रचंड क्रेझ आहे. यात जितेंद्र कुमार, रेवती पिल्लई, उर्वी सिंह, एहसास चन्ना, मयुर मोरे, रंजन राज हे कलाकार आहेत.

वीकेंडचा प्लॅन ठरत नाहीये? मग घरीच पाहा ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज, याच आठवड्यात प्रदर्शित झाल्यात कलाकृती

हाऊस ऑफ द ड्रॅगन सीझन 2

१६ जून रोजी जिओ सिनेमावर रिलीज झालेल्या या दुसऱ्या सीझनचा पहिला एपिसोड तुम्ही पाहिला असेल. आता त्याचा दुसरा एपिसोड २३ जूनला जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे आणि तिसरा एपिसोड ३० जूनला रिलीज होणार आहे.

महाराज

आमिर खानचा मुलगा जुनैद खान याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. २१ जून रोजी नेटफ्लिक्सवर त्याचा पहिला चित्रपट ‘महाराज’ प्रदर्शित झाला आहे. यामध्ये जयदीप अहलावत, शालिनी पांडे, शर्वरी वाघ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

ॲक्शन, सस्पेन्स अन् ड्रामा चित्रपट आवडत असतील, तर नक्की वाचा ‘ही’ यादी, सर्व सिनेमे ओटीटीवर येणार पाहता!

बॅड कॉप


अनुराग कश्यप आणि गुलशन देवय्या यांच्या मुख्य भूमिका असलेली वेब सीरिज ‘बॅड कॉप’ डिस्ने प्लस हॉटस्टारवर २१ जूनला प्रदर्शित झाली आहे. त्याचे दोन भाग आता रिलीज झाले आहेत, त्यामुळे तुम्ही ते एपिसोड पाहू शकता.

अ‍ॅक्शन नाही अन् रोमान्सही नाही, १५ कोटींमध्ये बनलेल्या ‘या’ सिनेमाने कमावले १०२ कोटी, कुठे पाहता येणार? वाचा

अरनमनई 4

या सुपरहिट तमिळ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. हा चित्रपट तुम्ही डिस्ने + हॉटस्टारवर २१ जूनपासून पाहू शकता. या चित्रपटात तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत दिसली आहे.

बिग बॉस ओटीटी ३

रिॲलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सीझन २१ जूनपासून जिओ सिनेमावर पाहायला मिळणार आहे. यावेळी शोचा होस्ट सलमान खान नसून अनिल कपूर आहे. या शोबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. आता काही महिने तुम्हाला जिओ सिनेमावर ‘बिग बॉस ओटीटी ३’ पाहायला मिळेल.