scorecardresearch

Premium

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीचं नशीब उजळलं, आता दिसणार वेब सिरीजमध्ये, म्हणाली…

सिरीजमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील एक लोकप्रिय अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

priyadarshini

मराठी ओरिजिनल सिरीज ‘शांतीत क्रांती’ला भव्‍य यश मिळाल्‍यानंतर ‘सोनी लिव्‍ह’ या मराठी ओरिजिनलचा बहुप्रतिक्षित दुसरा सीझन रीलीज करण्‍यासाठी सज्‍ज आहे. प्रेक्षकांना हसवणारी, आपलीशी वाटणारी आहे आणि आत्‍मपरीक्षणच्‍या आणखी एका रोमांचक प्रवासावर घेऊन जाणार आहे. पण यावेळी या सिरीजमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील एक लोकप्रिय अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

कथानकामध्‍ये नवीन ट्विस्‍टची भर घालत निर्मात्‍यांनी सिरीजमध्‍ये दोन नवीन कलाकारांचा समावेश केला आहे आणि त्या दोघीजणी म्हणजे प्रियदर्शिनी इंदळकर आणि प्रिया बॅनर्जी. ‘महाराष्‍ट्राची हास्‍यजत्रा’मधील उल्‍लेखनीय परफॉर्मन्ससाठी लोकप्रिय असलेली प्रियदर्शिनी इंदळकर समृद्धीची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे, जी श्रेयससोबत अरेंज मॅरेजमधील गुंतागूंतीचा सामना करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री प्रिया बॅनर्जी सॅन फ्रॅन्सिस्‍कोमधील एनआरआय कनीची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.

prithvik pratap ganpati
“मी स्वत:साठी खूप काही मागतो, पण यंदा…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचे गणरायाला साकडे
priya bapat birthday special article
प्रिया बापट : चाळीत वाढलेली बबली गर्ल ते बहुपेडी अभिनेत्री
maharashtrachi hasya jatra fame nikhil bane
चाकरमानी निघाले कोकणात, ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने शेअर केला खास व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “आपली संस्कृती…”
maharashtrachi hasya jatra fame rasika vengurlekar
“सई ताम्हणकर माझी लेडी क्रश”, ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीने केला खुलासा; म्हणाली, “तिचा बोल्डनेस…”

आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘त्या’ अभिनेत्रीचं नशिब उजळलं, सुबोध भावेबरोबर करणार बहुचर्चित मराठी चित्रपट, टीझर पाहिलात का?

‘शांतीत क्रांती २’बाबत प्रियदर्शिनी इंदळकर म्हणाली, ”मला समृद्धीच्‍या भूमिकेबाबत सांगण्‍यात आले तेव्‍हा मी लगेच या भूमिकेशी संलग्‍न झाले. ती प्रामाणिक मुलगी आहे, जिचा खऱ्या नात्‍यांच्‍या क्षमतेवर विश्‍वास आहे. सिरीजमधील तिच्‍या प्रवासामधून प्रेमाची खरी शक्‍ती दिसून येते. मी प्रेक्षकांना माझी भूमिका आणि सिरीजमधील श्रेयस सोबतचे तिचे नाते पाहताना बघण्‍यासाठी अत्‍यंत उत्‍सुक आहे.”

सिरीजमधील आपल्‍या भूमिकेबाबत सांगताना प्रिया बॅनर्जी म्‍हणाल्‍या, ”कनीच्‍या भूमिकेमध्‍ये उत्‍साह व आत्‍मचिंतनाचे सुरेख संयोजन आहे. माझ्या मते, आमच्‍या पिढीतील अनेकजण आनंदाचा शोध घेण्‍याप्रती तिच्‍या प्रयत्‍नाशी संलग्‍न होऊ शकतात. कनीच्‍या भूमिकेने मला आठवण करून दिली की जीवनातील सर्वात खास क्षण साध्‍या आणि सर्वात अनपेक्षित ठिकाणी मिळू शकतात. ‘शांतीत क्रांती २’ ही भावनांनी भरलेली रोलरकोस्‍टर सिरीज आहे आणि मला अविश्‍वसनीय प्रकल्‍पाचा भाग असण्‍याचा आनंद होत आहे.”

हेही वाचा : ‘त्यांच्यामुळे’ बिवाली अवली कोहलीला मिळाला आवाज; प्रियदर्शनी इंदळकरने उलगडलं गुपित

भडीपासोबत सहयोगाने टीव्‍हीएफद्वारे निर्मित आणि अरूनभ कुमार यांची निर्मिती असलेल्‍या या सिरीजचे दिग्‍दर्शक सारंग साठ्ये व पौला मॅकग्लिन आहेत. या सिरीजमध्ये अभय महाजन, अलोक राजवडे, ललित प्रभाकर, मृण्‍मयी गोडबोले, प्रिया बॅनर्जी, प्रियदर्शिनी इंदळकर प्रमुख भूमिकेत आहेत. ‘शांतीत क्रांती २’ १३ ऑक्‍टोबरपासून सोनी लिव्‍हवर प्रेक्षकांना पाहता येईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtrachi hasya jatra fame actress priyadarshani indalkar will be acting in shantit kranti 2 rnv

First published on: 27-09-2023 at 16:54 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×